Dhule Crime : पोलिसांनी रोखली गोवंश तस्करी; संशयित आरोपी, 8 गायी व वाहन कारवाई करत ताब्यात

Dhule Crime : आठ गायी व वाहनासह तीन लाख ७० हजारांचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतला आहे.
Cows cruelly tied to vehicles. The vehicle in the second photo.
Cows cruelly tied to vehicles. The vehicle in the second photo.esakal
Updated on

पिंपळनेर : सामोडे (ता. साक्री) गावाजवळील दहिवेल चौफुलीवर गोवंश जातीचे जनावरांना वाहनात दाटीवाटीने, निर्दयतेने दोरीने बांधन कत्तलीसाठी घेऊन जात असताना संशयित आरोपींना ताब्यात घेत आठ गायी व वाहनासह तीन लाख ७० हजारांचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतला आहे. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे यांना माहिती मिळाली, की एक चारचाकी (एमएच ०४, डीडी ०४४८) या वाहनातून दाटीवाटीने, निर्दयतेने एकमेकांना दोरीने बांधून कत्तलीकरिता गायी व गोऱ्हे असलेले वाहन दहिवेलकडून पिंपळनेरकडे येत आहे. (Police intercepted cattle smuggling suspected accused 8 cows and vehicle detained )

बर्गे यांनी पोलिस पथकातील पोलिस हेडकॉन्स्टेबल वामन चौधरी यांना सामोडे गावाजवळील दहिवेल चौफुलीवर थांबवून, नाकाबंदी करून कारवाई करावी, असे कळविले. त्यांचे मार्गदर्शनाने बुधवारी (ता. २) सकाळी सहाच्या सुमारास नाकाबंदी करून संशयित आरोपी अमीर खान अनवर खान पठाण (वय ३३, रा. रहेमताबाद एरिया, साठफुटी रोड, मालेगाव, जि. नाशिक) हा गाडीत आठ गायींना दाटीवाटीने दोरीने बांधून कत्तलीसाठी घेऊन जात असताना ताब्यात घेत आठ गायी व वाहनासह तीन लाख ७० हजारांचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतला आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काले, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे पथकातील वामन चौधरी, विश्वेश हजारे, प्रकाश मालचे, भरत बागूल, पंकज माळी, पंकज वाघ, रवींद्र सूर्यवंशी यांनी संबंधित कामगिरी केली

Cows cruelly tied to vehicles. The vehicle in the second photo.
Dhule Crime News : अतिक्रमित वनजमिनीच्या वादातून गोळीबार; रामपुरा फाटा परिसरात तीन जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.