Dhule News : शिंदखेडा लॉजमालक, वेटरला पोलिसांची नोटीस!

Dhule News : मातोश्री लॉजवर मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास अश्लील चाळे करताना विवाहित महिलेसह तीन कॉलेज तरुणी व तीन तरुण असे शिंदखेडा पोलिसांना छाप्यात सापडल्याने लॉजमालक व वेटरला नोटीस बजावली.
Matoshree Lodge
Matoshree Lodgeesakal
Updated on

Dhule News : शिंदखेडा शहरातील परिवहन महामंडळाच्या बसस्थानकासमोरील मातोश्री लॉजवर मंगळवारी (ता. १६) सकाळी अकराच्या सुमारास अश्लील चाळे करताना विवाहित महिलेसह तीन कॉलेज तरुणी व तीन तरुण असे शिंदखेडा पोलिसांना छाप्यात सापडल्याने पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी ३५ प्रमाणे लॉजमालक व वेटरला नोटीस बजावली.

या लॉजवर अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची गुप्त बातमी शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाल्यावरून हवालदार इकलाख पठाण, हवालदार अनंत पवार.

हवालदार हेमराज जाधव, महिला पोलिस कर्मचारी सुनीता परदेशी, रजनी पाटील व चालक चेतन माळी यांनी लॉजवर मंगळवारी छाप्यात तीन तरुण व चार तरुणी अश्लील चाळे करताना मिळून आले. (latest marathi news)

Matoshree Lodge
Dhule Monsoon Update : लामकानीत 85 मिलिमीटर पाऊस! घरांची पडझड, शेतशिवाराचे नुकसान

शिंदखेडा शहरातील मातोश्री लॉजमालक हरीश संतोष जाधव (४२, रा. जाधवनगर, शिंदखेडा) व लॉजवरील वेटर अनिल बळिराम वरसाळे (रा. शिंदखेडा) यांना पोलिस निरीक्षक पाटील यांनी फौजदारी कायदा ३५ प्रमाणे नोटीस बजावली.

Matoshree Lodge
Dhule News : माजी नगराध्यक्ष पवारचा जामीनाबाबत अर्ज नामंजूर! पाटील पितापुत्र खून प्रकरणी खंडपीठात कामकाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.