Dhule Marathon 2024 : धुळे पोलिस दी रिअल हीरो! मॅरेथॉन-2024 चे यशस्वी नियोजन

५ फेब्रुवारी २०२३ ला पहिली धुळे मॅरेथॉन स्पर्धा झाली. तिला अभूतपूर्व यश मिळाले. हाच सिलसिला कायम राहावा, असे मनोमनी असताना जिल्हा पोलिस प्रशासनाने ‘सकाळ’सह अनेकांच्या साथीने धुळे मॅरेथॉन-२०२४ (सीझन २)चे नियोजन केले.
Superintendent of Police Shrikant Dhiware, Additional Superintendent of Police Kishore Kale.
Superintendent of Police Shrikant Dhiware, Additional Superintendent of Police Kishore Kale. esakal
Updated on

Dhule Marathon 2024 : राज्यातील इतर काही महानगरांप्रमाणे निरामय आरोग्यासाठी धुळे महानगरात मॅरेथॉन स्पर्धा व्हावी, असा मनोदय जिल्हा पोलिस प्रशासनाने २६ डिसेंबर २०२२ ला ‘सकाळ’ माध्यम समूहापुढे मांडला. त्यास लागलीच सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ५ फेब्रुवारी २०२३ ला पहिली धुळे मॅरेथॉन स्पर्धा झाली.

तिला अभूतपूर्व यश मिळाले. हाच सिलसिला कायम राहावा, असे मनोमनी असताना जिल्हा पोलिस प्रशासनाने ‘सकाळ’सह अनेकांच्या साथीने धुळे मॅरेथॉन-२०२४ (सीझन २)चे नियोजन केले. (Dhule Police Successful planning of Marathon 2024 news)

त्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक प्रतिसाद मिळाला. त्यातून...‘लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया...’ असेच धुळे मॅरेथॉनच्या निर्भेळ यशाविषयी म्हणावे लागेल. एरवी एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली की त्याच्या जागेवर येणारा नवीन अधिकारी पूर्वीच्या अधिकाऱ्याने सुरू केलेले सामाजिक उपक्रम किंवा सामाजिक प्रकल्प सुरूच ठेवेल असे नाही.

जो-तो आपापल्या धाटणीप्रमाणे नवनवीन सामाजिक उपक्रम, प्रकल्प राबवीत आपला ठसा उमटविण्याचा प्रयत्न करतो. मात्र, या विचारास नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी छेद दिला. त्यांनी धुळेकरांच्या निरामय आरोग्यासाठी धुळे मॅरेथॉन-२०२४ (सीझन २)चे नियोजन करण्यात सकारात्मक भूमिकेतून हिरिरीने पुढाकार घेतला.

त्यांच्या खाद्याला खांदा लावून अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी नियोजनाला आकार देण्यास सुरवात केली. प्रशासनातील सहकारी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बहुमोल साथीने धुळे मॅरेथॉन सीझन-२ चे काटेकोर नियोजन अमलात आले. त्यात ‘हिट धुळे-फिट धुळे’ हे घोषवाक्य, तर ‘रन फॉर पांझरा’ ही थीम ठरली.

सोबतीला चार विभाग

जिल्हाधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता, जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश टिळे यांच्याशी समन्वय साधत श्री. धिवरे यांनी या चारही विभागांना सोबतीला घेतले. त्यांना या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोलाची साथ दिली.

Superintendent of Police Shrikant Dhiware, Additional Superintendent of Police Kishore Kale.
Dhule Marathon 2024: ‘हिट धुळे-फिट धुळे’सह जल्लोष! पोलिस कवायत मैदानावर फुल टू धमाल

महापालिकेचा बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, महापालिकेचा आरोग्य व स्वच्छता विभाग, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग आदींनी नियोजनात भरीव योगदान दिले. त्यामुळे धुळेकरांच्या निरामय आरोग्याच्या लोकोत्सवाला वेगळी झळाळी लाभत गेली.

स्पर्धेचा जोश वाढला

पोलिस प्रशासनाच्या या नियोजनावर मीडिया पार्टनर ‘सकाळ’ माध्यम समूहासह शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर एसव्हीकेएम संस्था, धुळे-पळासनेर टोल प्लाझा, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडसह काही सेवाभावी संस्था आणि जिल्ह्यातील नामांकित औद्योगिक प्रकल्प, व्यावसायिकांनी दानशूरतेतून यशाचा कळस चढविला.

ब्रॅन्ड ॲम्बेसेडर आंतराष्ट्रीय पातळीवरील कुस्तीगीर संग्राम सिंग, सावरपाडा एक्स्प्रेस व अर्जुन पुरस्कारविजेती कविता राऊत, क्रांती साळवे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा अपर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांनी सामाजिक बांधिलकीतून धुळे महानगरात उपस्थिती देत मॅरेथॉन स्पर्धेतील जोश वाढविला.

कठोर मेहनत फलदायी

पोलिस कवायत मैदानावर रविवारी (ता. ४) पहाटे पाच ते सकाळी साडेदहापर्यंत धुळे मॅरेथॉन-२०२४ (सीझन २) स्पर्धेंतर्गत निरामय लोकोत्सव रंगला. साडेपाच तासांचा हा लोकोत्सव यशस्वी होण्यासाठी दीड महिन्यापासून पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, आयोजन समितीप्रमुख अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सदस्य निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी.

Superintendent of Police Shrikant Dhiware, Additional Superintendent of Police Kishore Kale.
Dhule News: चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 वैद्यकीय अधिकारी, पण एकही थांबेना! 25 हजार लोकसंख्या वाऱ्यावर

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, गृहशाखेचे उपअधीक्षक धनंजय पाटील, ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, स्पर्धा समन्वयक सहाय्यक पोलिस अधिकारी पंडित सोनवणे, सायबर सेलच्या प्रतिनिधींसह पोलिस दलाचे शहरासह जिल्ह्यातील अन्य सर्व अधिकारी.

शिक्षणाधिकारी, आशिष अजमेरा, आशिष पटवारी, संग्राम लिमये, दीपक अहिरे, डॉ. राहुल बच्छाव, निखिल सूर्यवंशी आदी परिश्रम घेत होते. अशा सर्वांच्या मेहनतीचे धुळेकरांसह स्पर्धकांच्या महाप्रतिसादामुळे चीज झाले. ४ फेब्रुवारीचा रविवार आणि धुळे मॅरेथॉन-२०२४ (सीझन २) स्पर्धा अविस्मरणीय ठरली.

या विधायक लोकोत्सवात पोलिस अधीक्षकांसह सहकाऱ्यांचे योगदान पाहता मॅरेथॉनच्या निर्भेळ यशात पोलिस- द रिअल हीरो ठरल्याचे म्हणावेसे लागेल. ते सेलिब्रेटी, ब्रॅन्ड ॲम्बेसेडर आणि उपस्थित राजकीय नेत्यांनीही बोलून दाखविले.

"मॅरेथॉनचे यश हे आमच्या सामुदायिक बांधिलकीचा पुरावा आहे. यशस्वी धुळे मॅरेथॉनमागे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघाला, सहभागी धुळेकरांसह सर्व स्पर्धकांना सलाम आहे. सूक्ष्म नियोजन, परिश्रम आणि सर्व सहभागधारकांसोबतचा योग्य समन्वय या उपक्रमाच्या प्रत्येक पैलूत दिसून आल्याने आणि मॅरेथॉनला महाप्रतिसाद लाभल्याने या स्पर्धेसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाच्या समर्पणाला यशाची झळाळी लाभली आहे."-श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक, धुळे

Superintendent of Police Shrikant Dhiware, Additional Superintendent of Police Kishore Kale.
Dhule Marathon 2024: ‘हिट धुळे-फिट धुळे’सह जल्लोष! पोलिस कवायत मैदानावर फुल टू धमाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.