Vidhan Sabha Election : धुळ्यात गरब्याभोवती ‘राजकीय रिंगण’; विधानसभा निवडणुकीमुळे नवरात्रोत्सवाचा माहोल ‘कॅच’

Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील नवरात्रोत्सवात गरबा नृत्य मंडप सजले आहेत. गरबा नृत्याचा उत्साह संचारला आहे.
Garba painted by Gujarati community at Keshav Garden near Manohar Talkies in the city on the occasion of Navratri festival.
Garba painted by Gujarati community at Keshav Garden near Manohar Talkies in the city on the occasion of Navratri festival.esakal
Updated on

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील नवरात्रोत्सवात गरबा नृत्य मंडप सजले आहेत. गरबा नृत्याचा उत्साह संचारला आहे. त्यात भरीस भर म्हणून राजकीय नेत्यांनी गरबा रिंगणाभोवती गर्दी होत आहे. देवीच्या आराधनेत नृत्य जागरणाची प्रथा रुळू लागल्याने नव्या संस्कृतीत नवी बाजारपेठही आकारास येऊ लागली आहे. शहरातील बाजारपेठेत यंदा दांडिया नृत्याला लागणाऱ्या कपड्यांची विशिष्ट दुकाने सजली. गोल, त्रिकोणी-चौकोनी काचांना रेशीम धाग्यांमध्ये बसवून आकर्षक कलाकुसर केलेले कपडे विक्री होत आहेत. (Political arena around poverty in Dhule due to Assembly elections )

त्यासोबतच सुसंगत स्वतंत्र दागिनेही आहेत. कंबरपट्टा, बिंदी किंवा मांगटिका, गळ्यातला हार, मनगट भरणारे कडे किंवा कंगण असे दागिन्यांचे नानाविध प्रकार आहेत. कपडे आणि दागिने असा एकत्रित पेहराव विकत घ्यायचा ठरवले तर त्याची किंमत सात ते दहा हजारांच्या आसपास आहे. एका पेहरावाची किंमत दीड हजार ते साडेतीन हजारांपर्यंत आहे. एक दिवसाच्या भाड्यानेही पेहराव देण्याची व्यवस्था बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

Garba painted by Gujarati community at Keshav Garden near Manohar Talkies in the city on the occasion of Navratri festival.
Dhule Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसकडून 3 जागांची मागणी; जिल्ह्यात रंगत वाढली

विविध स्पर्धांचे आकर्षण

शहरात दांडिया महोत्सव आयोजित करणारे विविध व्यावसायिक, व्यक्ती, मंडळ, संस्था स्पर्धाही आयोजित करत आहेत. नवरात्रीत नऊ विविध रंग ठरलेले आहेत. त्या रंगांच्या पेहरावातील आकर्षक कपडे परिधान केलेल्या महिला, तरुणीला बक्षीस देऊन सन्मानित करण्याचीही प्रथा सुरू झाली आहे. विविध कॉलनी वसाहतींमधील महिला मंडळांशी संपर्क साधून गरबा नृत्याचे पेहराव विक्री किंवा भाडेतत्त्वाने देण्यासाठी सध्या समाजमाध्यमातील विविध प्रकारांचा उपयोग करताना दिसून येत आहेत.

गरब्याची धूम

यंदाच्या सार्वजनिक गणपती मंडळांची संख्या मोठी होती. त्यातील अर्ध्या मंडळांमध्येही देवीची स्थापना झाली आहे. त्यामुळे गरबा नृत्याची धूम सुरू आहे. तरुणींचे ढोल पथक, त्यांच्याकडूनही गरबा नृत्य नियोजनानुसार होत आहे. उत्सवी साहित्याने बाजारपेठ सजली आहे. यातील उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गरबा नृत्यात सर्वपक्षीय नेते उतरले आहेत. त्यात ज्यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे, त्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. ते ब्रँडींग करण्याची व नवरात्रोत्सवाचा माहोल कॅच करण्याची संधी सोडत नसल्याचेही चित्र आहे.

Garba painted by Gujarati community at Keshav Garden near Manohar Talkies in the city on the occasion of Navratri festival.
Vidhan Sabha Election: तळोदा-शहादा मतदारसंघातून इच्छुकांची संख्या जास्त; कोणत्या पक्षाकडून कोणाची लॉटरी लागते याकडे जिल्ह्याचे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.