Dhule Political: भाजपच्या राजवटीतील मागणी आता काँग्रेसच्या खासदारांकडे! डॉ. बच्छावांकडे धुळे-पुणे रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी

Political News : धुळ्यातून मिळणारी ही रेल्वे प्रवासी सेवा सर्वांसाठी सुकर होती. रुग्णांसह विद्यार्थी, व्यापारी व विविध घटकांसाठी ही सेवा लाभदायी होती.
Railway
Railwayesakal
Updated on

Dhule Political : भाजपचे नेते डॉ. सुभाष भामरे खासदार असताना धुळे-पुणे रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी होती. याकामी त्यांच्यासह आमदार जयकुमार रावल यांनी पाठपुरावा सुरू केला. आता लोकसभेच्या धुळे मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्या डॉ. शोभा बच्छाव खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

त्यामुळे धुळे-पुणे व इतर रेल्वेसेवांबाबत त्यांच्याकडे मागण्यांचा पाऊस सुरू झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी पुणे रेल्वेसेवेची मागणी लावून धरली आहे. (demand to start Dhule Pune railway service to Dr Bachhav)

प्रा. पाटील यांनी डॉ. बच्छाव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की कोरोनाच्या संकटकाळापूर्वी धुळे-मुंबई व परतीची आणि धुळे-पुणे व परतीची, अशी रोज रेल्वेसेवा मिळत होती. दोन कोचची पुणे रेल्वेसेवा चाळीसगावहून महाराष्ट्र एक्स्प्रेसला जोडून दिली जात होती. धुळ्यातून मिळणारी ही रेल्वे प्रवासी सेवा सर्वांसाठी सुकर होती. रुग्णांसह विद्यार्थी, व्यापारी व विविध घटकांसाठी ही सेवा लाभदायी होती.

तिहेरी व्यवस्था झाली

मनमाड-पुणे आणि पुणे-मनमाड अशी पॅसेंजर सेवाही सुरू होती. या पॅसेंजरचे रेक दिवसभर मनमाड येथे ठेवण्याची व्यवस्था नसल्याने ही सेवा इगतपुरीपर्यंत दिवसा चालविली जात होती. त्याच काळात धुळे रेल्वेस्थानकावर स्टेबल इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था नसल्याने धुळ्यापर्यंत मागणी असूनही ही सेवा सुरू होत नव्हती.

सध्या धुळे रेल्वेस्थानकात पूर्ण लांबीचा प्लॅटफॉर्म तयार झाला असून, इलेक्ट्रिसिटी आणि स्टेबल लाइन, अशी तिहेरी व्यवस्था झाली आहे. त्यामुळे मनमाड-पुणे पॅसेंजर ही पूर्वाश्रमीची सेवा होती तीच सेवा रात्रीच्या वेळेस धुळे-पुणे व पुणे ते धुळे रात्रीच्या वेळेस सुरू केली जाऊ शकते.

सर्वांना लाभदायक सेवा

धुळे-पुणे ही पॅसेंजर सुविधा सुरू झाली तर धुळ्यातून पुण्याकडे जाणाऱ्या जिल्हावासीयांचा खासगी लक्झरी सेवेवर होणारा खर्च वाचू शकतो. त्याचा लाभ गरीब, गरजू प्रवाशांना,‍ विद्यार्थ्यांना होऊ शकतो. कमी खर्चाची ही रेल्वे पॅसेंजर सेवा सुरू झाल्यास ग्रामीण व शहरी मजुरी करणारे, पुण्याला उपचारासाठी जाणारे रुग्ण या सेवेचा लाभ घेऊ शकतील. पॅसेंजर सेवा ही आर्थिकदृष्ट्या सर्वांना परवडणारी आहे. रेल्वेचे आर्थिक उत्पन्नही वाढणार आहे. त्यामुळे धुळे-पुणे रेल्वेसेवा तत्काळ सुरू करावी, अशी आग्रही मागणी आहे. (latest marathi news)

Railway
Manoj Jarange: मराठ्यांचे 2-4 माकडं फडणवीसांच्या...'; मनोज जरांगे तिसऱ्या टप्प्यानंतर 'बॉम्ब' फोडणार

डॉ. बच्छावांची ग्वाही

मागणी रेल्वेसेवा तत्काळ पूर्ववत सुरू करून जिल्ह्यातून पुणे व पश्‍चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय टाळावी. रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत शिवसेना रेल्वे कामगार सेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले होते. त्यामुळे धुळे-मुंबई रेल्वेसेवा ही पूर्ववत सुरू झाली आहे. धुळे-पुणे रेल्वे सुरू करण्याबाबत लोकसभा निवडणुकीतील आचारसंहितेमुळे अडचण झाली होती; परंतु ही अडचण आचारसंहिता संपल्याने दूर झाली आहे.

ते लक्षात घेत खासदार डॉ. बच्छाव यांनी मागणी रेल्वे सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रा. पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडल प्रबंधकांना अवगत करण्यात आले आहे. त्यावर संसदेत २२ जुलैला होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करेन. मागणी रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत ठोस प्रयत्न करेन, अशी ग्वाही खासदार डॉ. बच्छाव यांनी दिल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.

सनेरांच्या मागणीवर रेल्वेला पत्र

रेल्वे क्रमांक ०९०५० नंदुरबार-दादर सेवा अमळनेरपासून सुरवात करण्यात यावी आणि रेल्वे क्रमांक ०९०४९ दादर-नंदुरबार सेवा अमळनेर स्थानकापर्यंत करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांनी पत्राद्वारे खासदार डॉ. बच्छाव यांच्याकडे केली. त्यानुसार मुंबईत कामानिमित्त अमळनेर, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा येथील शेकडो प्रवाशी प्रवास करत असतात.

धुळ्याहून अमृतसर एक्स्प्रेस काही महिन्यांपासून बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मागणी रेल्वेसेवा देण्यात आल्यास अमळनेर, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा येथील प्रवाशांना फायदा होईल. प्रशासकीय कामे योग्य वेळेत होतील, अशी मागणी सनेर यांनी केली. त्यावर डॉ. बच्छाव यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देत ही मागणी पूर्ण करावी, असा आग्रह धरला आहे.

Railway
मिऱ्या किनारी आक्राळ विक्राळ स्वरुपाच्या लाटांचे तांडव; बंधाऱ्याचे भवितव्य धोक्यात, अजस्त्र लाटांनी मनात भरतेय धडकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.