धुळे : धुळ्यात गेल्या महापालिकेतील भाजपच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात आणि गेल्या नऊ महिन्यांतील प्रशासक काळात कोट्यवधी रुपये खर्चातून रस्त्यांची कामे झाली. या रस्त्यांचा दर्जा कसा, हा प्रश्न अलाहिदा. पण झालेले रस्तेही जास्त दिवस टिकतील यादृष्टीने काहीही दक्षता, उपाययोजना केली जात नाही. विविध कार्यक्रम, सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक रस्ते, चौकांसह विविध कॉलन्यांमध्ये मंडप टाकण्यासाठी कुठलीही परवानगी न घेता सर्रास नव्याकोऱ्या रस्त्यांवर खड्डे केले जातात. (potholes in newly constructed roads is source of fury among citizens )
हा प्रकार पाहून धुळ्यातील सुजाण, सुशिक्षित नागरिकही अवाक असून, त्यांच्यात रोष दिसत आहे. शहरात गेल्या पाच-सहा वर्षांत कोट्यवधी रुपये खर्चातून रस्त्यांची कामे झाली, सुरू आहेत. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान राज्यस्तर, जिल्हास्तर योजना, मूलभूत सोयीसुविधा, आमदार निधी, अल्पसंख्याक निधी, दलित वस्ती योजना, दलितेतर वस्ती, मनपा फंड, विकासशुल्क अशा कितीतरी योजनांतून ही रस्त्यांचे कामे होत आहेत.
याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही त्यांच्या अखत्यारीत काही रस्त्यांची कामे झाली. दुसरीकडे अद्यापही अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था आहे, तर अनेक कॉलन्या कच्च्या-पक्क्या रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. जेथे रस्ते नाहीत त्या भागातील रहिवाशांचे दुःख वेगळे आहे. मात्र, जेथे रस्ते झाले ते किमान वर्ष-दोन वर्ष टिकतील याचीही दक्षता संबंधित यंत्रणा घेताना दिसत नाही. याची प्रामुख्याने जबाबदारी असलेली महापालिकेची यंत्रणा झोपलेली असते. (latest marathi news)
नव्या रस्त्यांची वाट
कोणत्याही कामासाठी रस्ता खोदताना संबंधितांना रीतसर महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, शहरात पाइपलाइन टाकण्यासाठी, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी अथवा कोणत्याही छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी मंडप टाकायचा असेल तरी बिनधास्तपणे व वाट्टेल त्या प्रकारे रस्ता खोदून, खड्डे पाडून नागरिक मोकळे होतात. त्यातून या रस्त्यांची वाट लागते. विविध सण-उत्सवाच्या काळात तर असे प्रकार सर्रास पाहायला मिळतात.
काँक्रिट रस्त्यांवर खड्डे केल्याने त्यात पाणी मुरते व नंतर ते रस्ते खराब होतात. डांबरी रस्त्यांची तर व्यथाच न्यारी आहे. निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे आधीच हे रस्ते तकलादू असतात. त्यात पुन्हा खड्डे खोदणे, रस्ताच खोदून काढल्याने संपूर्ण रस्त्याची वाट लागते. नकाणे रोड हा नव्यानेच झालेला रस्ता असताना अनेक ठिकाणी भुयारी गटाराचे काम, गळत्या दुरुस्तीसाठी वारंवार खोदकाम, एसआरपी रिक्षा स्टॉपजवळ चारी खोदून होत असलेली डागडुजी अशा विविध कारणांनी या रस्त्याचीही ठिकठिकाणी दुरवस्था पाहायला मिळते.
''धुळे शहरात महत्प्रयासाने रस्त्यांची कामे झाली, होत आहेत. त्यामुळे हे रस्ते जास्तीत जास्त दिवस सुस्थितीत राहतील, यादृष्टीने सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणाने विनापरवानगी रस्ते खोदणे बेकायदेशीर आहे. याप्रश्नी रिव्ह्यू घेतला जाईल. मंडप टाकताना रस्ते खराब होत असल्याचे समोर आल्यास संबंधित मंडपवाल्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाईल.''- अमिता दगडे-पाटील, आयुक्त, धुळे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.