Dhule: कंत्राटी शिक्षक नियुक्तीत स्थानिकांना प्राधान्य! शिक्षण आयुक्तालयाची सूचना; जबाबदार अधिकाऱ्यांशी करारनामा करणे आवश्‍यक

Latest Dhule News : कमी पटसंख्येच्या शाळांतील शिक्षकांच्या दोनपैकी एक जागेवर कंत्राटी पद्धतीने डीएड, बीएड पात्रताधारक उमेदवारांची निवड करण्याचा निर्णय २३ सप्टेंबरला शालेय शिक्षण विभागाने घेतला.
teacher
teacheresakal
Updated on

धुळे : दहा आणि त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांतील शिक्षकांच्या दोनपैकी एक जागेवर कंत्राटी पद्धतीने डीएड, बीएड पात्रताधारक उमेदवाराच्या निवड प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना शिक्षण आयुक्तालयाने दिल्या आहेत. त्यानुसार या निवड प्रक्रियेत ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा, स्थानिक उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अधिक गुण असलेल्या उमेदवाराचा विचार करावा, तसेच तालुक्यातूनही उमेदवार उपलब्ध होत नसल्यास संबंधित जिल्ह्यातील उमेदवाराचा विचार करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (appointment of contract teachers)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.