Dhule Lok Sabha Election : डॉक्टरांचाही आता राजकीय दबावगट!

Dhule News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात प्रथमच डॉक्टरांचा दबावगट निर्माण होत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत थेट भूमिका घेतली आहे.
doctor
doctor esakal
Updated on

Dhule News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात प्रथमच डॉक्टरांचा दबावगट निर्माण होत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत थेट भूमिका घेतली आहे. डॉक्टरांनी उमेदवारांना भेटून त्यांच्या मागण्या मांडाव्यात. याचबरोबर सर्व उमेदवारांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेत डॉक्टरांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा करावी. (Dhule Lok Sabha Election)

भविष्यात वैद्यकीय क्षेत्राशी निगडित येणाऱ्या नव्या कायद्यात डॉक्टरांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने हे पाऊल उचलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विविध उद्योग क्षेत्रांतील संघटना त्यांचा दबावगट तयार करून सरकारकडून मागण्या मान्य करून घेत असतात. याचबरोबर उद्योगासाठी अनुकूल सरकारी धोरणाचा आग्रह धरतात.

याचेच अनुकरण आता डॉक्टरांनी करण्याचे ठरविले आहे. भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३०४ (अ)नुसार वैद्यकीय निष्काळजीच्या प्रकरणात डॉक्टरांना पूर्वी दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद होती. आता भारतीय न्यायसंहितेच्या कलम २६ अंतर्गत हा गुन्हा येतो. त्यात शिक्षेची तरतूद पाच वर्षे करण्यात आली.

डॉक्टरांनी याला विरोध केल्यानंतर डॉक्टरांसाठी शिक्षेची तरतूद पुन्हा दोन वर्षे करण्याची घोषणा सरकारने केली. या प्रकरणानंतर आपल्या हक्कासाठी वेळीच आवाज उठविण्याची भूमिका डॉक्टरांकडून मांडण्यात आली. आता इंडियन मेडिकल असोसिएशनने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दिशेने पाऊल उचलले आहे. (latest marathi news)

doctor
Dhule Lok Sabha Constituency : निवडणुका आल्या अन गेल्या, प्रकल्पांची केवळ चर्चाच!

उमेदवारांपर्यंत पोचणार

इंडियन मेडिकल असोसिएशनची प्रत्येक शाखा त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांपर्यंत पोचणार आहे. उमेदवारांसमोर डॉक्टरांच्या मागण्या सादर केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारीच्या टप्प्यापासूनच डॉक्टरांच्या मागण्यांची दखल घेणारा उमेदवार निवडून आल्यास तो डॉक्टरांच्या मागण्यांना व्यवस्थित न्याय देऊ शकतो, अशी यामागील इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका आहे. यानिमित्ताने देशात डॉक्टरांचा दबावगट निर्माण झाल्याचे पाहावयास मिळणार आहे.

दबावगट काय करणार?

* डॉक्टरांसाठी भविष्यात काय करणार, याचा उमेदवारांच्या संकल्पपत्रात समावेश.

* डॉक्टरांच्या मागण्यांवर उमेदवाराला भूमिका मांडण्याचे आवाहन.

* डॉक्टरांच्या समस्यांबाबत उमेदवारांमध्ये जागृती.

* लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांशी संवाद.

* उमेदवारांसमोर डॉक्टरांच्या अडचणींची मांडणी.

doctor
Dhule Drought News : रब्बी, खरीपाने केली शेतकऱ्यांची निराशा; उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.