धुळे : शहरात मालमत्ता करप्रश्नी जनमानसात मोठा रोष आणि संभ्रम आहे. फेरमूल्यांकनाच्या प्रक्रियेनंतर काही लोकप्रतिनिधींनी दिलासा मिळाल्याच्या घोषणा केल्या मात्र, तसा प्रत्यक्ष दिलासा मिळाल्याचे चित्र नाही. नियमानुसार दिलासा मिळण्याची शक्यताही दिसत नाही. धुळ्यात महापालिकेकडून काहीही सोयी-सुविधा उपलब्ध होत नसताना तसेच इतर शहरांच्या तुलनेत कर आकारणी जास्त असल्याचाही एक सूर ऐकायला मिळतो.
हा सूर मात्र बरोबर लागल्याचे दिसते. राज्यातील पनवेल, अहमदनगर, जळगाव, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अकोला, मालेगाव या शहरांपेक्षा धुळ्यात ‘एकत्रित मालमत्ता कर’ जास्त आहे. इतर विविध करांची बेरीज केली तर केवळ छत्रपती संभाजीनगर व अकोला शहरात धुळ्यापेक्षा जास्त कर आकारला जातो. (dhule Property Tax more than Panvel Nagar Jalgaon)