Dhule News : ग्रंथालयांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागवले; जिल्ह्यातील शासनमान्य संस्थांना लाभ

Latest Dhule News : समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी ज. सु. पाटील यांनी केले.
library
libraryesakal
Updated on

Dhule News : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत २०२४- २०२५ साठी जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी ज. सु. पाटील यांनी केले. (Proposals invited till November 30 for libraries)

पाटील यांनी सांगितले, की केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना मुंबईस्थित ग्रंथालय संचालनालयामार्फत राबविण्यात येतात.

यात २०२४- २०२५ साठी समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयाकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहे. त्यासंदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना https://www.rrrlf.gov.in/ या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

library
Jalgaon News : फळपीक विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार 327 कोटींचा लाभ; केंद्रीय राज्यमंत्री खडसे

निधीचा असा लाभ

समान निधी योजनेत इमारत बांधकाम व विस्तार योजनेत २५ लाख अर्थसहाय्य देण्यात येते. परंतु योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेतंर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करू नये. असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्य देण्यात येते.

यात फर्निचर खरेदी चार लाख, इमारत बांधकाम दहा ते पंधरा लाख रुपये देण्यात येते. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी अडीच लाख व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरणासाठी दोन लाख अर्थसहाय्य देण्यात येते. महोत्सवी वर्ष जसे ५०, ६०, ७५, १००, १२५, १५० वर्षे साजरे करण्यासाठी सहा लाख २० हजार, इमारत विस्तारासाठी दहा लाखांचे अर्थसहाय्य देण्यात येते.

राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षणवर्ग व जागरूकता कार्यक्रमासाठी दीड लाख, अडीच लाख, तीन लाख अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्यासाठी सहा लाख ८० हजाराचे अर्थसहाय्य देण्यात येते.

ग्रंथालयांना आवाहन

योजनांचा लाभ घेण्यासाठी https://www.rrrlf.gov.in/ किंवा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे येथे संपर्क साधावा. ग्रंथालयांनी उल्लेखीतपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव इंग्रजी व हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी पाटील यांनी केले आहे.

library
Raver MSRTC Depot : रावेर उत्पन्नात अव्वल; प्रवासीसेवेचा बोजवारा! पन्नास वर्षांपासून दुर्लक्षित; प्रवाशांसह कर्मचारीही त्रस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.