Dhule News : भारत विकास परिषदेच्या धुळे शाखेतर्फे व महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीच्या सीएससार फंडातून दिव्यांगांना कृत्रिम अवयव (हात, पाय कॅलिपर) मोजमाप शिबिर घेण्यात आले. कृत्रिम अवयव मोजमाप केलेल्या धुळे शहर व जिल्ह्यातील १७५ दिव्यांगांना कृत्रिम मॉड्यूलर हात-पाय बसवून देण्यात येतील. सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्चातून हे काम होत आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील डॉ. संजय खोपडे यांच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये शिबिर झाले. (Prosthetics give new life to disabled people Measuring 175 beneficiaries )
पुणे येथील विकलांग केंद्राच्या वैद्यकीय पथकाने प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची तपासणी करून कृत्रिम हात व पायांसाठी मापे नोंदवून घेतली. शिबिरात नोंदणी केलेल्या दिव्यांगांना १८ ऑगस्टला मापानुसार कृत्रिम हात-पाय वाटप करण्यात येतील. या शिबिरात वाटप केल्या जाणाऱ्या कृत्रिम मॉड्यूलर पायाची बाजारभावाप्रमाणे ५० हजारांपेक्षा जास्त, तर कृत्रिम हाताची किंमत २५ हजारांवर आहे. असे अवयव कंपनी सीएसआर फंड व धुळे येथील दात्यांच्या देणगीतून मोफत देणार आहे. या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांगांच्या जीवनात एक नवे परिवर्तन घडणार आहे. (latest marathi news)
शिबिराच्या माध्यमातून सुमारे पावणेदोन कोटी बाजार मूल्यांच्या कृत्रिम अवयवांचे वितरण शक्य झाले आहे. शिबिराच्या औपचारिक प्रारंभप्रसंगी विकलांग केंद्राचे प्रमुख विनय खटावकर, भारत विकास परिषद धुळे शाखेचे अध्यक्ष राजेश वाणी, सचिव अजय कासोदेकर, माजी अध्यक्ष राजेंद्र जाखडी, डॉ. धनंजय शुक्ल, प्रशांत येवले, प्रा. विजयसिंह सिसोदिया, महेंद्र विसपुते, विलास कोठावदे, मोहन चित्ते, दीपक जैन, सुनील कपिल, विनीत जैन, रामलाल जैन, डॉ. प्राची शुक्ल, वीणा गानू, आनंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मान्यवरांचे सहकार्य
जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, रवी बेलपाठक, प्रशांत मोराणकर, राजेश पाटील, संजय देसले, साहेबचंद जैन, सुभाष कांकरिया, राहुल कुलकर्णी आदी मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली. शिबिरासाठी बाळासाहेब भदाणे, अनुप अग्रवाल, जिजाबराव पवार, भरत अग्रवाल, पवन पोद्दार, प्रियदर्शन चितळे, प्रकाश पाटील, विशाल हरसोत यांचे सहकार्य लाभले. भारत विकास परिषदेचे पदाधिकारी, लोकमान्य हॉस्पिटलचे डॉक्टर, परिचारिका आदींनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.