Dhule News : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह. (Dhule Protests in public places hunger strike ban on loudspeakers)
सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने, हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण, लाउडस्पीकर वापरण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी निर्गमित केले आहे. (latest marathi news)
जिल्हादंडाधिकारी गोयल यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये नमूद केल्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण, लाउडस्पीकर वापरण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्णहोईपर्यंत निर्बंध घालीत असल्याचे पत्रकान्वये कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.