Dhule News : राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातर्फे प्रवाशांच्या मागणीनुसार १ मेपासून धुळे ते पुणे अतिजलद बससेवेला प्रारंभ होणार आहे. या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्या येथील अधिकाऱ्यांनी केले आहे. (Dhule Pune non stop bus from May 1 dhule news)
राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दहा नवीन बस उपलब्ध झाल्या आहेत. या बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर महामंडळाच्या येथील अधिकाऱ्यांनी धुळे-पुणे बससेवा सुरू करण्याचेही सांगितले होते. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
ही बस रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी देवपूर बसस्थानकातून सुटेल. शहरातील कालिका माता मंदिराजवळ असलेल्या ट्रॅव्हल्स पॉइंटवर देखील प्रवासी घेण्यासाठी ही बस पाच ते दहा मिनिटे थांबेल. त्यानंतर धुळे बसस्थानकावरून उर्वरित प्रवाशांना घेऊन बस रात्री साडेदहाला पुणेसाठी मार्गस्थ होईल. धुळ्यातून निघाल्यानंतर ही बस मार्गावरील कोणत्याही बस स्थानकावर थांबणार नाही.
नॉनस्टॉप चांदवड, लासलगाव, निफाड, सिन्नर, संगमनेर मार्गे पुणे येथे सकाळी साधारण पाच ते साडेपाचदरम्यान पोचेल. दरम्यान, चाकणपासून पुढे प्रवाशांच्या मागणीनुसार बस थांबा घेईल. परतीच्या प्रवासात पुणे बसस्थानकातून रात्री दहाला ही बस नॉनस्टॉप धुळ्याकडे मार्गस्थ होईल.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
आरामदायी बस
धुळे-पुणे बस दोन बाय दोन पुशबॅक सीट असलेली बीएस-६ टेक्नॉलॉजीची आरामदायी व एयर सस्पेन्शन असलेली ४१ सीटर बस आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसचे ऑनलाइन आरक्षण देखील उपलब्ध केले आहे. या आरामदायी बसचे धुळे ते पुणे आरक्षणासह फूल भाडे ५३० रुपये तर महिला, पाच ते बारा वर्षाखालील बालके, ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अर्धे तिकीट २६५ रुपये असे असेल.
तर ७५ वर्षावरील नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना लागू असेल. या बससेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक विजय गीते, विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे, आगार व्यवस्थापक पंकज देवरे, वासुदेव देवराज यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.