Dhule News : बोरविहीर-नरडाणा रेल्वेच्या गैरसमजुतीवर पडदा; नागरी हक्क संरक्षण समितीची माहिती

After the meeting in Sadashivnagar MP Dr. Members of Civil Rights Protection Committee felicitating Subhash Bhamre.
After the meeting in Sadashivnagar MP Dr. Members of Civil Rights Protection Committee felicitating Subhash Bhamre.esakal
Updated on

Dhule News : बोरविहीर-नरडाणा रेल्वे सुविधा ही मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचाच एक भाग आहे किंवा कसे याबाबत खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मंत्र्यांऐवजी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पत्र सादर करावे, अशी मागणी नागरी हक्क संरक्षण समितीने केली होती. (Dhule Railway Misconceptions Cleared by dr bhamre dhule news)

त्यानुसार खासदार डॉ. भामरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांचे अपेक्षेनुसार पत्र सादर केल्याने गैरसमजुतीवर पडदा पडल्याचे सांगत या रेल्वेमार्गाबाबत नागरी हक्क संरक्षण समिती खासदारांच्या पाठीशी राहील, असे समिती सरचिटणीस महेश घुगे यांनी सांगितले.

बोरविहीर (ता. धुळे)-नरडाणा (ता. शिंदखेडा) हा रेल्वेमार्ग मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्पाचाच भाग असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे पत्र डॉ. भामरे यांनी नागरी हक्क संरक्षण समितीपुढे सादर केले. मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक नरेश ललवाणी यांच्या स्वाक्षरीचे पत्र समितीचे सरचिटणीस घुगे व पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

रेल्वेबाबत प्रश्‍न

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्प गती देऊ शकतो. मात्र, अनेक लोकप्रतिनिधींनी वर्षानुवर्षे आश्‍वासने दिली. असे असताना खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सतत पाठपुरावा करत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे पूर्वी निवडणूक कालावधीत दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते बोरविहीर-नरडाणा या रेल्वेमार्गाचे उद्‌घाटन झाले होते.

हा प्रकल्प मनमाड-इंदूर प्रकल्पाचाच एक भाग असल्याने या संपूर्ण प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. या संदर्भात खासदारांच्या बोलण्यावर धुळेकरांनी का विश्‍वास ठेवावा? त्यासाठी सक्षम रेल्वे अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे पत्र द्यावे, अशी मागणी नागरी हक्क संरक्षण समितीने खासदार डॉ. भामरे यांच्याकडे केली होती.

After the meeting in Sadashivnagar MP Dr. Members of Civil Rights Protection Committee felicitating Subhash Bhamre.
Dhule News : प्रस्तावांच्या दिरंगाईबाबत गोयल यांनी यंत्रणांना खडसावले; 55 कोटींचा खर्च

भामरेंकडून पत्र सादर

या पार्श्वभूमीवर नागरी हक्क संरक्षण समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक झाली. खासदार डॉ. भामरे उपस्थित होते. त्यांनी मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक नरेश ललवाणी यांच्या स्वाक्षरीचे पत्र समितीकडे सोपविले. या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी खासदार डॉ. हीना गावित, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या सहकार्याने कसे प्रयत्न केले व यश आले याची माहिती खासदार डॉ. भामरे यांनी दिली.

बोरविहीर-नरडाणा हा मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा भाग असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याचे पत्र डॉ. भामरे यांनी समितीला दिल्यानंतर श्री. घुगे यांनी ते समितीसमोर वाचून दाखविले. समितीचे अध्यक्ष अभियंता हिरालाल ओसवाल, उत्तमराव पाटील, डॉ. संजय खोपडे, योगेंद्र जुनागडे, अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव, संतोज जैन यांनी मनोगत व्यक्त केले.

रेल्वे प्रकल्पाला अधिकृत मान्यता मिळवून दिल्याबद्दल खासदार डॉ. भामरे यांचे अभिनंदन केले. तसेच नागरी हक्क संरक्षण समितीची प्रकल्पाबाबत मागणी पूर्ण केल्याबद्दल डॉ. भामरे यांचे श्री. जुनागडे यांनी आभार मानले.

After the meeting in Sadashivnagar MP Dr. Members of Civil Rights Protection Committee felicitating Subhash Bhamre.
Dhule News : कारवाईच्या धाकाने थकबाकी अदा; 6 लाख रुपये वसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.