Dhule Heavy Rain : कापडणे परिसरात सलग पाचव्या दिवशीही पाऊस! वादळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

Latest Dhule News : या वादळाने ठिकठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली. शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसाने त्रेधातीरपीठ उडाली. वाळविण्यासाठी टाकलेला कापूस पुन्हा ओला झाला.
Scene of rain falling with stormy wind in Bhatnadi area.
Scene of rain falling with stormy wind in Bhatnadi area.esakal
Updated on

कापडणे : परिसरात रविवारी (ता.१३) दुपारी तीनला वादळी वाऱ्यासह पाऊणतास तुफान मुसळधार पाऊस झाला. या वादळाने ठिकठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली. शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसाने त्रेधातीरपीठ उडाली. वाळविण्यासाठी टाकलेला कापूस पुन्हा ओला झाला. सततच्या पावसाने शेतकरी हतबल झाला असून, आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

Scene of rain falling with stormy wind in Bhatnadi area.
Nashik Heavy Rain: ‘परती’च्या पावसाचा जोरदार दणका! पिंपळगाव परिसरात ढगफुटीसदृश धुवाधार पावसाने झोडपले; खरीप पिकांचे मोठे नुकसान

रविवारी दुपारी धुळे तालुक्यातील नगाव, धमाणे, तीसगाव, ढंढाणे, वडेल, रामनगर, देवभाने, सरवड, धनूर, लोणकुटे, तामसवाडी, न्याहळोद, जापी व बिलाडी शिवारात मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले. सलग पाचव्या दिवसाच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान वाढत चालले आहे. बाजरी, मका, ज्वारी, कापूस, भुईमुगाचे सत्तर टक्क्यांपर्यंत नुकसान वाढविले आहे.

पंचनामे केव्हा कराल?

सततच्या पावसाने मोठे नुकसान होऊनही पिकांचे सरसकट पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पंचनामे केव्हा कराल, असा उद्विग्न सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

"पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची बनवाबनवी केली जात आहे. सरसकट पंचनामे करणे गरजेचे आहे."- आत्माराम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

Scene of rain falling with stormy wind in Bhatnadi area.
Nashik Heavy Rain : बागलाणमध्ये परतीच्या पावसाने दाणादाण! मदतीची माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.