Ahirani Sahitya Sammelan : अहिराणी साहित्य संमेलन बोधचिन्हाचे प्रकाशन

Ahirani Sahitya Sammelan : सातव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
Hon'ble while releasing the emblem of the 7th All India Ahirani Sahitya Sammelan.
Hon'ble while releasing the emblem of the 7th All India Ahirani Sahitya Sammelan.esakal
Updated on

Dhule News : खानदेश साहित्य संघ धुळे व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ यांच्यातर्फे २५ फेब्रुवारी २०२४ ला नेर (ता. धुळे) येथे होणाऱ्या सातव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.

ज्येष्ठ साहित्यिक जगदीश देवपूरकर अध्यक्षस्थानी होते. बोधचिन्हाचे अनावरण प्रकाश पाटील, विश्राम बिरारी, शाहीर श्रावण वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. (Release of Ahirani Sahitya Sammelan emblem)

Hon'ble while releasing the emblem of the 7th All India Ahirani Sahitya Sammelan.
Dhule Municipality News : प्लॅस्टिक व्यापाऱ्यांना 35 हजार दंड; मनपा पथकाची कारवाई

संमेलनाच्या बोधचिन्हासंदर्भात प्रकाश पाटील यांनी माहिती दिली. खानदेशी ओवी वाङ्‍मय, साहित्य, कृषी संस्कृती, ऐतिहासिक किल्ल्यांचा ठेवा व लोकसंस्कृतीचा आरसा या बोधचिन्हातून दर्शविल्याचे ते म्हणाले.

कवी देवपूरकर यांनी संमेलन कार्यालयात उपस्थित राहून योगदान देण्याविषयी सांगितले. बैठकीस खानदेश साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी, सचिव रमेश बोरसे, धुळे तालुकाध्यक्ष शाहीर श्रावण वाणी.

अमळनेर तालुकाध्यक्षा सुनीता पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्ष विजय निकम, कमलेश शिंदे, रत्नाकर पाटील, गुलाबराव मोरे, गोकुळ पाटील, प्रभाकर सूर्यवंशी, मोहन वाणी, रमेश पवार, रामदास जगताप आदी उपस्थित होते.

Hon'ble while releasing the emblem of the 7th All India Ahirani Sahitya Sammelan.
Dhule News : धुळ्यात 5 दिवस महासंस्कृती महोत्सव : 26 फेब्रुवारीला उद्‍घाटन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.