चिमठाणे : सुकवद-शिंदखेडा-चिमठाणे- दुसाने ते वाघापूर या राज्य मार्ग क्रमांक १२ या रस्त्याचे ६६ किलोमीटर काम हायब्रीड ॲन्युइटी योजनेतून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात चिमठाणे ते शिंदखेडा राज्य मार्गाचे काम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. (Dhule Removal of thorn bushes on Chimthane Shindkheda state road has started marathi news)
सोमवारी (ता.८) ‘सकाळ’ ने या रस्त्यावरील काटेरी झुडपांच्या समस्येचे वृत्त ‘चिमठाणे-शिंदखेडा राज्यमार्ग व्यापला काटेरी झुडपांनी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराने जेसीबीने काटेरी झुडपे काढण्यास सुरवात केली. यामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.
हायब्रीड ॲन्युइटी योजनेतून १६८ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. चिमठाणे ते शिंदखेडा रस्त्याचा ‘मेनटेनेस’ ठेकेदाराकडे दहा वर्षांसाठी असताना सहा महिन्यांत काटेरी झुडपे रस्त्यावर येऊन ठेपले आहेत. याबाबत ‘सकाळ’ ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शिंदखेडा उपविभागाने ठेकेदाराला काटेरी झुडपे काढणे भाग पाडले.
सायंकाळपर्यंत शिंदखेडा रेल्वेस्टेशन ते अलाणे फाट्यापर्यंत काटेरी झुडपे काढली. या रस्त्यावरील वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे प्रवास धोक्याचा ठरत आहे. रस्त्यावर वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत होते. काटेरी झुडपे काढल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
"चिमठाणे-शिंदखेडा रस्त्यावरील काटेरी झुडपे रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. सोमवारी ‘सकाळ’ ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित ठेकेदाराला आदेश दिल्याने काटेरी झुडपे काढण्यास सुरवात केली आहे."- संजय सूर्यवंशी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शिंदखेडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.