Dhule News : महिलांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढत राहणे आवश्यक आहे. त्यासोबतच महिला कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य दुर्लक्षित महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य व मार्गदर्शन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन कार्यक्रम झाला. (Dhule Resident Deputy Collector Gawande statement Women should continue to fight for fair rights)
निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे अध्यक्षस्थानी होते. अपर तहसीलदार वैशाली हिंगे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, अशोक चौधरी, सुरेश पाईकराव, एस. यू. तायडे आदी उपस्थित होते. या वेळी कर्तृत्ववान मातांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले.
अपर तहसीलदार हिंगे म्हणाल्या, की देशातील महिलांनी जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहावे.
महिला कर्मचारी संघटनेच्या प्रतिभा घोडके, एनपीएस कर्मचारी कृती समितीच्या पल्लवी शर्मा, महिला दक्षता समितीच्या सुनंदा निकम, महिला व बालविकास विभागाच्या अर्चना पाटील, महिला सक्षमीकरण केंद्राच्या ॲड. रोहिणी महाजन, ॲड. गायत्री भामरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
भारती मराठे, प्रतिभा कारले, रत्नमाला सांळुखे, स्नेहा अवकारे, भाग्यश्री गाडीलोहार, शीतल मोरे, कांचन खुर्चणे, स्वप्ना देवरे, वैशाली साळुंखे, सविता परदेशी, तृप्ती पाटील, प्रतीक्षा मगर, वर्षा पाटील, यशोदा तायडे, सुवर्णा सूर्यवंशी, अंजली कोते यांच्यासह विविध विभागांतील महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.