Dhule News : जिल्हा प्रशासनाला 76 कोटींचा महसूल; धुळ्यात 106 टक्के वसुलीद्वारे उद्दिष्ट पूर्ण

Dhule News : जिल्हा प्रशासनाला २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात जमीन महसूल तसेच गौणखनिजातून सुमारे ७५ कोटी ८४ लाख २५ हजारांचा महसूल प्राप्त झाला.
Money
Money esakal
Updated on

Dhule News : जिल्हा प्रशासनाला २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात जमीन महसूल तसेच गौणखनिजातून सुमारे ७५ कोटी ८४ लाख २५ हजारांचा महसूल प्राप्त झाला. यात १०६.३३ टक्के महसूल वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यात महसूल प्रशासनास यश मिळाले. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण करताना गौणखनिज करवसुली कमी झाल्याचे दिसून येते. सर्वाधिक २० कोटी ५१ लाखांचा महसूल धुळे ग्रामीणमधून प्राप्त झाला. (Dhule Revenue of 76 crore to district administration)

जिल्ह्यातील दोन प्रशासकीय उपविभागांतील आठ तहसील व अपर तहसील कार्यालये मिळून २०२३-२०२४ या वर्षासाठी ७१ कोटी ३३ लाखांच्या वसुलीचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाला मिळाले होते. पैकी १०६.३३ टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. मार्चअखेर जिल्हा प्रशासनाला ७५ कोटी ८४ लाख २५ हजारांचा महसूल मिळाला.

यात जमीन महसुलाचे ३३ कोटी ४८ लाख, तर गौणखनिज करवसुलीचे ३७ कोटी ८५ लाखांचे उद्दिष्ट होते. ३१ मार्चअखेर जमीन महसूल ३८ कोटी ८८ लाख ९ हजार, तर गौणखनिज कर ३६ कोटी ९६ लाख १६ हजार वसूल करण्यात आला. महसूल प्रशासनाने शेतसारा, शेतजमीन एनए करताना भरावे लागणारे शुल्क.

वतन, सरंजामनिहाय भरून घेतलेली नजराणा रक्कम, इतर गौणखनिजांचे कर संकलित करताना काटेकोर नियोजन केले. करवसुलीचे काम कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी पूर्ण केले. सात-बारा, आठ-अ उतारे घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून शेतसारा, शिक्षण कर वसूल केल्यानंतरच त्यांची कामे पूर्ण केली. (latest marathi news)

Money
Dhule Lok Sabha Constituency : सर्वसमावेशक तिसऱ्या पर्यायासाठी सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरु

नागरिकांकडे असलेली विविध करांची थकबाकी वसूल करण्यात महसूल विभागाला यश आले. यामुळे १०६.३३ टक्के वसुली झाली. जमीन महसुलाची ११६.१३ टक्के वसुली झाली असली तरीही गौणखनिज करवसुली कमी दिसून येत आहे. जिल्ह्यात दगड खाणी, डेब्रिज, माती, रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या उत्खनानातून केवळ ९७.६५ टक्के उत्पन्न मिळाले आहे.

तहसीलनिहाय महसूल वसुली (लाखांत)

तहसील... उद्दिष्ट... वसुली... टक्के

* धुळे ग्रामीण... १४९५... २०५१.९८... १३७.२६

* धुळे शहर... ८४५... ८८८.७१... १०५.१०

* साक्री... १०६०... ९७८.७३... ९२.३३

* पिंपळनेर... ७३५... ७०६.४१... ९२.३३

* शिंदखेडा... ११४५... ९६३.०९... ८४.१८

* दोंडाईचा... ६२८... ६२१.६६... ९८.९९

* शिरपूर... १२२५... ९९९.२४... ८१.५७

* जि.का. धुळे... ०.००... ३४०.६७... ०.००

* एकूण... ७१३३... ७५८४.२५... १०६.३३

Money
Jalgaon News : उमेदवार बदला, अन्यथा अर्ज भरणार; माजी आमदार संतोष चौधरी यांची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()