Dhule Rain : नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा; करवंद, अनेर, सुलवाडे, हतनूर प्रकल्पांतील पाण्याच्या पातळीत वाढ

Dhule News : करवंद व अनेर मध्यम प्रकल्प (ता. शिरपूर), सुलवाडे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) तसेच हतनूर धरण (ता. भुसावळ, जि. जळगाव) प्रकल्पातील जलपातळीत वाढ झाली आहे.
Hatnoor
Hatnooresakal
Updated on

Dhule News : करवंद व अनेर मध्यम प्रकल्प (ता. शिरपूर), सुलवाडे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) तसेच हतनूर धरण (ता. भुसावळ, जि. जळगाव) प्रकल्पातील जलपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग जाण्याची शक्यता आहे. हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. यात १२ ते २० तासांत सुलवाडे बॅरेजमधून विसर्ग सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल. (Dhule Rain)

त्यामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. करवंद मध्यम प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे अरुणावती नदीच्या दोन्ही तीरांवरील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. करवंद मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून पुढील काही तासांत विसर्ग जाण्याची शक्यता आहे.

अनेर मध्यम प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. सद्य:स्थितीत अनेर प्रकल्पाच्या स्पिल-वेवरून १८ हजार ५०० क्यूसेकने विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या लोकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, शिरपूर पाटबंधारे उपविभागीय अधिकारी, करवंद व अनेर डॅमच्या शाखा अधिकाऱ्यांनी केले.

तापी नदीत विसर्ग हतनूर धरणाच्या पाणीपातळीत सोमवारी (ता. २९) वाढ झाल्याने सकाळी नऊच्या सुमारास १२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. परिणामी ५३ हजार ३९५ क्यूसेक विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. हतनूरमध्ये रविवारी (ता. २८) रात्री बाराला पाणीपातळी २१०.५०० मीटर झालेली असताना एकूण पाणीसाठा २१४.०० दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा टक्केवारी ५५.१५ नोंदविण्यात आली. (latest marathi news)

Hatnoor
Dhule News : हरणमाळ, नकाणे तलाव जम्बो कालव्याद्वारे भरा; माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोमवारी (ता. २९) सकाळी सातला २१०.७४० मीटर इतका पाणीसाठा जमा होऊन ५७.६३ टक्के नोंदविण्यात आला. नंतर पाण्याची आवक वाढल्याने सकाळी आठला २२६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होऊन ५८.२५ टक्के नोंदविण्यात आला. - दरवाजे पूर्ण उघडले अवघ्या दोन तासांनी म्हणजेच सकाळी दहाला पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने २३०.५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाल्याने ४१ पैकी १२ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले.

त्याखेरीज स्थानिक नाल्यांद्वारे पाण्याची आवक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पुढील १२ ते २० तासांत सुलवाडे बॅरेजमधून विसर्ग सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल. तापीकाठावरच्या गावांतील लोकांना सूचना देऊन तापी नदीपात्रामध्ये आपली जनावरे सोडू नयेत, अथवा नदीपात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षितस्थळी हलविण्यात यावेत, असे पाटबंधारे उपविभागाच्या (क्रमाक एक) साक्री उपविभागीय अभियंत्यांनी कळविले आहे. -

Hatnoor
Dhule Accident : ट्रकने वाहनाला दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं; अपघातात पत्रकार हर्षल भदाणेंचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.