SAKAL Impact : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराविरोधात ‘सकाळ’ ने लावून धरलेल्या विषयाला अनुसरून शनिवारी (ता.८) सकाळी अकराच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रात चिमठाणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंह गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक घेण्यात आली. ‘सकाळ’ ने वारंवार चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या गलथान कामकाजाचे वृत प्रसिद्ध केल्याने जिल्हा परिषद माजी सदस्य वीरेंद्रसिंह गिरासे व शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमाकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. (Review meeting at Chimthane Primary Health Centre )
बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कर्मचारी कमी असल्याने दैनंदिन कामकाज करताना तारेवरची कसरत करावी लागते, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. तृष्णा वाघ यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद सदस्य गिरासे यांनी रूग्ण आरोग्य केंद्रात आल्यावर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करावेत, कोणाचीही तक्रार येऊ नये, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेवर आरोग्य केंद्रात हजर राहावे, टाळाटाळ केल्यास त्यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार जाईल, असे सांगितले. (latest marathi news)
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सवलतींचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. तृष्णा वाघ, डॉ. रितिका अहिरराव, लिपिक प्रदीप गिरासे, सर्व सीएचओ व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.