SAKAL Impact : एकाच आवारातील शाळा एकत्रीकरणाचा स्थगिती : सोनी कदम

SAKAL Impact : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकाच आवारात भरणाऱ्‍या शाळा एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरु होती.
Zilla Parishad school number  two building.
Zilla Parishad school number two building.esakal
Updated on

SAKAL Impact : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकाच आवारात भरणाऱ्‍या शाळा एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरु होती. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त मालिकेद्वारे स्वतंत्र शाळांचे महत्त्व व गुणवत्ता याबाबत सविस्तर मांडणी करत एकत्रीकरणाबाबत भेदभाव होत असल्याची भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आल्याने या वृत्तमालिकेचे शिक्षकांसह, शैक्षणिक वर्तुळ आणि ग्रामस्थांमधून जोरदार समर्थन करण्यात आले. (Postponement of Consolidation of Schools in One Campus )

यामुळे शाळा एकत्रीकरणाला स्थगिती दिल्याची माहिती शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम यांनी ‘सकाळ’ला दिली. धुळे जिल्ह्यातील अवधान, मोघण, शिरूड, सोनगीर, बोरीस, नेर, कापडणे, मालपूर, चिमठाणे, रुदावली, वर्षी, वारुड व नरडाणा येथील एकाच आवारात भरणाऱ्‍या शाळांच्या एकत्रीकरणाबाबत जोरदार हालचाली सुरु होत्या. यात मे महिन्यात पंधरापैकी आठ शाळांचे एकत्रीकरण करण्याचे आदेश निघाले होते. (latest marathi news)

Zilla Parishad school number  two building.
SAKAL Impact : सारंगखेडा-कुकावल रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्यास सुरवात; ‘सकाळ’मधील वृत्ताची दखल

त्यानंतर मे मध्ये केवळ कापडणे, सोनगीर व नेर येथीलच शाळा एकत्रीकरणाचे आदेश निघाले. या तीन गावांमधून या निर्णयाला तीव्र विरोध झाला. याबाबत ‘सकाळ’मध्ये ‘शाळा एकत्रीकरणाचा घाट’ या वृत्तमालिकेतून सडेतोड भूमिका मांडण्यात आली. अन जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी जागे झाल्याने या निर्णयास स्थगिती मिळाल्याचे पुढे आले आहे.

विरोध करणारे ठराव आवश्यक

जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम यांनी सांगितले की, एकाच आवारात भरणाऱ्‍या शाळांच्या एकत्रीकरणाबाबत ठराव झालेला होता. मात्र त्यास स्थगिती देण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्या पंधरा गावांतील ग्रामपंचायतींसह शालेय व्यवस्थापन समित्यांचे एकत्रीकरणास सुयोग्य विरोध करणारे ठराव आवश्यक आहेत. त्यानंतर या एकत्रीकरणास पूर्णतः स्थगिती देण्यात येईल. दरम्यान एकत्रीकरणास स्थगिती देण्याची माहिती पुढे आल्यानंतर सर्व स्तरातून ‘सकाळ’ मधील वृत्तमालिकेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

Zilla Parishad school number  two building.
SAKAL Impact : फैजपूर येथे नालेसफाई पूर्णत्वास! ‘सकाळ’चा पाठपुरावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.