साक्री : सत्ता हस्तगत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच येथील दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून साक्री तालुका विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते. आदिवासीबहुल साक्री तालुका मूलभूत विकासापासून अद्यापही वंचितच आहे.
आदिवासी समुदायाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने निर्णय अपेक्षित असतानाच कृषी, सिंचन, शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि औद्योगिक विकासासह रोजगारनिर्मितीला चालना मिळणे अपेक्षित आहे. यादृष्टीने मुख्यमंत्री शिंदे नेमकी काय भूमिका वठवितात याकडे तालुकावासीयांचे लक्ष असेल. (Sakri taluka development should be boosted by CM visit)