Dhule News : छत्रपती शिवाजी महाराज आज अवतरले तर त्यांना यातना होतील : संजय आवटे

Latest Marathi News : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एसएसव्हीपीएस संस्थेतर्फे नॉर्थ पॉइंट स्कूलच्या प्रांगणात शिवचरित्र व्याख्यानमाला सुरू आहे.
Sanjay Awte while inaugurating the second flower on Sunday on the occasion of Shivacharitra lecture series at North Point School
Sanjay Awte while inaugurating the second flower on Sunday on the occasion of Shivacharitra lecture series at North Point Schoolesakal
Updated on

धुळे : छत्रपती शिवाजी महाराज आज अवतरले तर त्यांना सद्यःस्थिती पाहून प्रचंड यातना होतील, मी निर्मिलेले सुराज्य कुठे हरवले हे जाणताना ते हळहळतील, शिवाय अनेक प्रश्नांचा गुंता झटक्यात निकाली निघेल, अशी भूमिका संजय आवटे यांनी मांडली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त (Chhatrapati Shivaji Maharaj ) एसएसव्हीपीएस संस्थेतर्फे नॉर्थ पॉइंट स्कूलच्या प्रांगणात शिवचरित्र व्याख्यानमाला सुरू आहे. त्यातील दुसरे पुष्प श्री. आवटे यांनी रविवारी (ता. १८) गुंफले. संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे अध्यक्षस्थानी होते. महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, सिनेट सदस्य डॉ. एस. टी. पाटील, जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे प्रमुख पाहुणे होते. (Dhule shivcharitra vyakhyan mala marathi news)

छत्रपती शिवाजी महाराज आज अवतरले तर...या विषयाची गुंफण श्री. आवटे यांनी केली. यात आज जो-तो स्वार्थी दिसतोय, माता-भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतोय, भ्रष्टाचार आणि काय...काय घडतंय, अशी स्थिती पाहून छत्रपती शिवराय व्यथित होतील, त्यांना त्यांनी निर्मिलेल्या सुराज्याची विचित्र गत पाहून प्रचंड यातना होतील, असे श्री. आवटे म्हणाले.

शिवचरित्र व्याख्यानमालेंतर्गत स्पर्धेत मंडलिक विद्यालयातील प्राथमिक गटात द्वितीय आलेली विद्यार्थिनी उत्कर्षा सतीश पाटील हिच्या प्रतापगडावरील पराक्रमाच्या छोटेखानी व्याख्यानाने श्रोत्यांची दाद मिळविली. संस्थेच्या वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. संध्या पाटील, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

Sanjay Awte while inaugurating the second flower on Sunday on the occasion of Shivacharitra lecture series at North Point School
Jalgaon Loksabha Election: जळगाव लोकसभा मतदारसंघाचा पेच वाढणार? कुणाच्या पदरात पडणार जागा, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

विशाल ठाकरे, डॉ. अनिता देवरे यांनी आभार मानले. मनीषा गोसावी यांनी पसायदान सादर केले. माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने वीस वर्षांपासून ही व्याख्यानमाला होत आहे.

ॲड. हलकारे यांचे आज व्याख्यान

नॉर्थ पॉइंट स्कूलच्या प्रांगणात सोमवारी (ता. १९) सायंकाळी सातला शिवचरित्र व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प ॲड. गणेश हलकारे गुंफतील. ते ‘शिवछत्रपती व आजचे भारतीय संविधान’ या विषयाची गुंफण करतील. यानंतर व्याख्यानमालेचा समारोप होईल. धुळेकरांना उपस्थितीचे आवाहन आमदार पाटील यांनी केले.

Sanjay Awte while inaugurating the second flower on Sunday on the occasion of Shivacharitra lecture series at North Point School
HSC Exam 2024 : बाभूळगाव केंद्राची बारावीची आसन व्यवस्था; भाटगावसह येवल्यातील विद्यार्थी देणार परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.