Dhule News : उन्हाळी दीड महिन्याच्या सुट्टीनंतर १५ जूनपासून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा उघडत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश मिळतील. त्या अगोदर विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक आणि गुलाबपुष्प देवून स्वागत होणार आहे. दीर्घ उन्हाळी सुट्टीचा आनंद घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शाळा उघडण्याचे वेध लागले आहेत. (school start from 15 june )
राज्यात १५ जूनपासून सर्वच माध्यमांच्या शाळा उघडतील. पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद अवर्णनीयच असतो. पण, पूर्वीपेक्षा आनंदाने शाळेत दाखल होणारे विद्यार्थी विशेष कुतूहलाचा विषय होत आहेत. नाहीतर पूर्वी विद्यार्थ्यांना ओढतताणत शाळेत दाखल करावे लागायचे. आता परीस्थिती बदलली आहे. साऱ्यांनाच स्वतःहून शाळेचे वेध लागलेले असतात. शनिवारी १५ जूनला शाळेचा पहिला दिवस.
त्यानंतर रविवारी आणि सोमवारी बकरी ईदची सुट्टी आहे. मरगळ झटकून उत्साहाने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा दोन दिवसांची सुट्टी अनुभवता येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्राथमिकसह माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक निघणार आहे. (latest marathi news)
बैलगाडीसह, हत्ती, उंट आदींवरुन मिरवणुकीचे नियोजन होत आहे. लेझीमच्या गजरात चला चला शाळेत चला, चला शिकूया पुढे जावूया आदी घोषणांचा निनाद होणार आहे. शिवाय दरवर्षीप्रमाणे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश देण्याचे नियोजन शिक्षण विभागातर्फे सुरु आहे.
शाळांची वाढावी गुणवत्ता
प्रत्येक गावातील विद्यार्थी गावातीलच शाळेत शिकला पाहिजे. गावातीलच शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. शहरी शाळांमध्ये दाखल करण्याचे वाढलेले प्रमाण कमी होण्यासाठी शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण दमदार पावले उचलण्याची अपेक्षा पालकांमधून व्यक्त होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.