Dhule News : एकाच आवारातील शाळा हव्यात स्वतंत्रच! अन्यथा उपोषण; लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांचा इशारा

Dhule News : शाळा एकत्रित झाल्यास उपोषणास बसण्याची तयारी ग्रामस्थांनी सुरु केली आहे.
Zilla Parishad school number one and two should conduct pre-school preparatory meeting.
Zilla Parishad school number one and two should conduct pre-school preparatory meeting.esakal
Updated on

कापडणे : धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकाच आवारात भरणाऱ्‍या शाळांचे एकाच शाळेत रूपांतर करण्याची प्रक्रियेने वेग घेतला आहे. यापैकी तीन शाळांचे तोंडी आदेशाने एकत्रीकरण झाले आहे. मात्र अजूनही पोषण आहार वेगळा शिजतोय. म्हणजे प्रशासनाने केवळ लगीनघाई केलेली आढळून येत आहे. आता मात्र तिन्ही गावांतील पालकांसह ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. शाळा एकत्रित झाल्यास उपोषणास बसण्याची तयारी ग्रामस्थांनी सुरु केली आहे. (Dhule Schools in same premises should independent)

धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकाच आवारात भरणाऱ्‍या शाळांचा विषय शैक्षणिकसह राजकीय पटलावर गाजत आहे. पंधरा शाळांचे एकत्रीकरणास मंजुरी असताना आठ शाळांचे एकत्रीकरणाचा आदेश निघाला. त्यानंतर केवळ कापडणे, सोनगीर व नेर येथील एकाच आवारात भरणाऱ्‍या शाळांचे एकत्रीकरण होत आहे. या सापत्न वागणुकीने आणि एकत्रीकरणाच्या परिणामुळे पालकांमधून संताप व्यक्त होवू लागला आहे.

ग्रामस्थ अॅक्शन मोडवर

कापडणे, नेर व सोनगीर येथील पालक एकत्रीकरणाच्या अन्यायामुळे अॅक्शन मोडवर आले आहेत. ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्‍यांना निवेदन देणार आहेत. त्यानंतरही योग्य निर्णय न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे. (latest marathi news)

Zilla Parishad school number one and two should conduct pre-school preparatory meeting.
Nashik Agriculture : जिल्ह्यात खरिपाच्या एक लाख 11 हजार हेक्टरवर पेरण्या; पूर्व भागातील तालुक्यात सर्वाधिक पेरण्या

व्यवस्थापन समिती देणार निवेदन

शालेय व्यवस्थापन समिती हा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्‍यांकडे मांडत आहेत. समितीसह ग्रामपंचायतीचा ठराव करून, या निर्णयास विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. पण शाळा एकत्रित न होवू देण्याचा निर्धार त्यांच्यामधून व्यक्त होत आहे.

"कापडणे येथील दोन्ही शाळांचा पट १५० पेक्षा अधिक आहे. दोन्ही ठिकाणी पदोन्नती मुख्याध्यापक कार्यरत आहेत. मग दोन्ही शाळा एकत्रीकरणाचा घाट का प्रशासनाने घातला आहे. यास आमचा पूर्ण विरोध आहे. निर्णय रद्द न झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल."- नवल पाटील, अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती

Zilla Parishad school number one and two should conduct pre-school preparatory meeting.
Bacchu Kadu : 'माझ्या जिवाला धोका', आमदार बच्चू कडूंचं थेट पोलिस अधीक्षकांना पत्र; नेमकं काय आहे पत्रात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.