Shindkheda Assembly Election 2024 : इच्छुकांच्या गर्दीने झालाय तिढा

Latest Vidhan Sabha Election 2024 News : २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप बेडसे यांना भाजपचे जयकुमार रावल यांनी बेडसे यांना हरवून ' हॅट्ट्रीक ' केली होती. आमदार रावल यांचे निकटवर्तीय कामराज निकम यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची ' तुतारी ' हातात घेतली आहे.
Shindkheda Assembly Election 2024
Shindkheda Assembly Election 2024esakal
Updated on

विजयसिंह गिरासे : सकाळ वृत्तसेवा

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. २००९मध्ये मतदारसंघाची पूनर्रचना झाल्यानंतर माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी ' हॅट्ट्रीक ' करत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

यावेळीही भाजपतर्फे त्यांनाच उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) संदीप बेडसे,कामराज निकम, ज्ञानेश्वर भामरे, जुई देशमुख कॉँग्रेसतर्फे शाम सनेर, शिवसेना (उबाठा) कडून हेमंत साळुंखे यांनी त्या त्या पक्षांकडे उमेदवारीची मागणी केल्याने मतदारसंघामध्ये आघाडीत तिढा निर्माण झाला आहे.

२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप बेडसे यांना भाजपचे जयकुमार रावल यांनी बेडसे यांना हरवून ' हॅट्ट्रीक ' केली होती. आमदार रावल यांचे निकटवर्तीय कामराज निकम यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची ' तुतारी ' हातात घेतली आहे. (Shindkheda Assembly rush of aspirants)

Shindkheda Assembly Election 2024
Dhule Rural Constituency : धुळ्यात अग्रवालांची उमेदवारीत सरशी! भाजपला 4 जागा; धुळे ग्रामीण मतदारसंघाबाबत उत्सुकता शिगेला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.