Dhule Agriculture News : शिरपूरला कापूस क्षेत्रात 2 हजार हेक्टरने घट; मका आणि ऊसाच्या क्षेत्रात वाढ

Dhule Agriculture : गेल्या वर्षीच्या खरीप हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात तालुक्यातील खरिपाचे क्षेत्र घटले आहे.
Farmers ready for pre-kharif cultivation.
Farmers ready for pre-kharif cultivation.esakal
Updated on

Dhule Agriculture News : गेल्या वर्षीच्या खरीप हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात तालुक्यातील खरिपाचे क्षेत्र घटले आहे. कापूस, बाजरी आणि ज्वारी या पिकांच्या क्षेत्रात प्रामुख्याने घट झाली आहे. मका, सोयाबीन, मूग, तूरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. शिरपूर साखर कारखाना भाडेतत्वावर दिल्यानंतर लवकरच सुरु होणार असल्याच्या शक्यतेवर ऊसाच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. येथील कृषी विभागातर्फे यंदा ७४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. ( Shirpur cotton area decreased by 2 thousand hectares )

दरवर्षीप्रमाणे कापसाचे क्षेत्र सर्वाधिक असून, यंदा ५२ हजार ८७२ हेक्टरवर कापसाच्या लागवडीचे नियोजन आहे. मात्र, गेल्या हंगामाच्या तुलनेत कापसाच्या क्षेत्रात दोन हजार ८०५ हेक्टरची घट झाली आहे. बियाण्यांसाठी करावी लागणारी कसरत, खते व औषधांची दरवाढ, उत्पन्नाची अशाश्‍वती आणि दराबाबत अनिश्‍चितता यामुळे शेतकरी कापसापासून दूर जात असल्याचे मानले जात आहे.

योग्य दराची वाट बघत दीर्घकाळ कापूस सांभाळणे भाग पडत असल्याने शेतकऱ्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडते. तथापि, अद्यापही कापसाला प्रभावी पर्याय उपलब्ध होऊ शकलेला नाही. गेल्या खरीप हंगामात ७४ हजार ८३८ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली होती. पुरेशा पावसाअभावी अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्‍यांच्या हाती लागले नाही. जो काही शेतमाल बाजारात नेला, त्याला अपेक्षित दर मिळाला नाही. विशेषत: कापूस, ज्वारी आणि बाजरी उत्पादकांना मोठा फटका बसला.

त्याचा परिणाम यंदा जाणवत असून, या तिन्ही पिकांचे क्षेत्र घटले आहे. तुलनेत शेतकऱ्‍याला मका, तुरीसारख्या पिकांनी चांगला हात दिला. मक्याच्या क्षेत्रात तब्बल एक हजार ६२१ हेक्टरची वाढ झाली आहे. यंदा तालुक्यात उन्हाळी मूगही भरघोस उत्पन्न देऊन गेला. त्याला आठ ते साडेआठ हजारांदरम्यान दर मिळाला. तथापि, पावसाळी मुगाची अशाश्‍वती लक्षात घेऊन त्याचे क्षेत्र मर्यादित प्रमाणातच वाढले आहे. (latest marathi news)

Farmers ready for pre-kharif cultivation.
Dhule Agriculture News : उत्पादन घटूनही धुळ्यात सोयाबीन अल्पदरात; शेतकरी आर्थिक अडचणीत

उसाकडे लक्ष

२०१० पासून बंद असलेला शिरपूर साखर कारखाना मध्यप्रदेशातील माँ रेवा शुगर्स या खासगी कंपनीला भाडेतत्वावर देण्यात आला आहे. हस्तांतरणाची प्रक्रियाही पूर्ण झाली. त्यामुळे हा साखर कारखाना लवकरच सुरुच होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्‍यांना आहे. त्यामुळे गेल्या हंगामापेक्षा ऊसाचे क्षेत्र एक हजार ३४४ हेक्टरने वाढले आहे.

बियाण्यांचे नियोजन

२०२३-२४ च्या खरीप हंगामात येथील कृषी विभागाच्या नियोजनाखाली बी.टी.बियाण्यांची दोन लाख ७८ हजार ३८५ पाकिटांची विक्री झाली. यंदाच्या हंगामासाठी दोन लाख ६४ हजार २८६ पाकिटांचे नियोजन आहे. राशी, सुपरकॉट व लक्ष्मी या वाणांना सर्वाधिक मागणी आहे. मक्याच्या बियाण्यात सर्वाधिक २५ टक्के दरवाढ झाली असून, अ‍ॅडव्हान्टा, लक्ष्मीचा शिक्का आणि इकोसीड वाणांना सर्वाधिक मागणी आहे.

खतांचे नियोजन

२०२३ च्या खरीप हंगामात नॅनो युरियाच्या आठ हजार ९०८ बाटल्यांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे ०.३६ हजार मेट्रिक टन युरियाची बचत शक्य झाली. यंदाच्या हंगामात १८ हजार ४६० नॅनो युरिया बाटल्यांचे आवंटन मंजूर करण्यात आले असून, त्यामुळे युरियाची ०.८३ हजार मे.टन बचत शक्य होणार आहे. यंदा २७ हजार ५०८ मे.टन खतांचे नियोजन मंजूर केले असून, मार्चअखेर ११ हजार २७४ मे.टन खते उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

Farmers ready for pre-kharif cultivation.
Dhule Agriculture News : शिरपूर पॅटर्नमुळे शेती झाली बागायती

रासायनिक खते (कंसात मंजूर साठा, आकडे मे. टनमध्ये)

युरिया (१२३२४, ५४८९), डीएपी (१३५२, ३७३), एमओपी (८८४, ३०२), संयुक्त खते (९०२२, ३४२५), एसएसपी (३९२६, १६८५), एसएसपी (३९२६, १६८५).

पीक कर्जाचे वितरण

येथील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून यंदाच्या हंगामासाठी आतापर्यंत सुमारे ५७ कोटी ३६ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले. अद्यापही कर्जवाटप सुरुच आहे. शासकीय निर्देश प्राप्त झाल्यानंतर पीक विमा काढण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक केतन राऊळ यांनी दिली. विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वितरण करण्यात येते. गेल्यावर्षी घेतलेल्या पीक विम्यापैकी ८० टक्के शेतकऱ्‍यांचे दावे मंजूर झाले आहेत.

''तालुक्यातील शेतकऱ्‍यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. शेतकऱ्‍यांनी बियाणे खरेदी करतांना वाढीव दर देऊ नयेत. मृदा आरोग्यपत्रिका वाचनाच्या माध्यमातून तालुकाभरात शेतकऱ्‍यांपर्यंत जाऊन पीक शिफारस व खतांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा लाभ शेतकऱ्‍यांना निश्‍चितच होईल. शेतकऱ्‍यांनी लागवड, बियाणे, खते आदींबाबत कृषी विभागाशी संपर्क साधून माहिती घ्यावी.''- संजय पवार, तालुका कृषी अधिकारी, शिरपूर

''बोंडअळीच्या संकटामुळे कापसाच्या उत्पन्नाची शाश्‍वती नाही. त्यात दरही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कापसाविषयी अनुत्साही आहेत. त्याला मजूर टंचाईही कारणीभूत आहे. केळी, पपईला वादळी वाऱ्याची मोठी भीती असते. त्यामुळे नगदी शेती ही संकल्पनाच न परवडणारी ठरत आहे. शिरपूर साखर कारखान्यासारखा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवल्यास ऊसाचे क्षेत्र वाढेल व खऱ्‍या अर्थाने शेतकऱ्‍याला सुबत्ता लाभेल.''- चेतन पाटील, भटाणे, ता. शिरपूर, शेतकरी

Farmers ready for pre-kharif cultivation.
Dhule Agriculture News : नव्या खरिपात कोरडवाहू पिकांचाच बोलबाला; साक्री तालुक्यात शेतकरी पुन्हा शेतीकामात गुंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()