Dhule News : साधारण दोन महिन्यांपूर्वी शहरातील प्रभाग २ मध्ये कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यावर भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने पुन्हा काँक्रिट रस्त्यासाठी टेंडर काढण्यात आले. त्यामुळे ही टेंडर नोटीस काढणाऱ्या महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी व इतर पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे केली. (Dhule Shiv Sena demanded Municipal Commissioner to suspend concerned officials who floated tender for laying concrete on asphalt road)
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. एकीकडे प्रभाग २ सह संपूर्ण शहरातील ५०-६० टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्यांची दयनीय अवस्था असताना काही बेजबाबदार अधिकाऱ्यांनी साधारण दोन-चार महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या प्रभाग २ मधील रस्त्यासाठी पुन्हा सुमारे ७५ लाखांचे नवीन ई-टेंडर २८ फेब्रुवारीला महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले.
महापालिकेच्या या भोंगळ कारभाराबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांकडे हरकत नोंदविली आहे. लाखो-कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून पूर्ण झालेली तसेच दोन रस्त्यांचे पूर्ण बिल व एका रस्त्याचे सुमारे १४ लाख रुपये बिल पूर्वीच्या ठेकेदारांनी काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच रस्त्यांवर नवीन काँक्रिटचे रस्ते तयार करण्याबाबत फुगीर इस्टिमेटच्या आधारावर.
भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने ई-टेंडर नोटीस काढण्यात आली. महापालिकेचे संबंधित अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून काम करतात का, असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना केला. (latest marathi news)
शहरात मनपातील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून कोट्यवधींची कामे पूर्ण झाल्याचे फलक लावले आहेत. यातून धुळेकरांची दिशाभूल केली जात आहे. प्रत्यक्षात त्याच त्या कामांसाठी लाखो, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.
आयुक्तांनी लक्ष घालावे
यावर मनपा आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष घालावे. तसेच बेकायदेशीर टेंडर नोटीस रद्द करून, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अन्यथा शिवसेनास्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे श्री. माळी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन,
शहर संघटक देवीदास लोणारी, उपमहानगरप्रमुख संतोष शर्मा, संदीप चौधरी, शिवाजी शिरसाळे, मनोज शिंदे, भय्या बागूल, सागर निकम, वैभव पाटील, सागर साळवे, अक्षय पाटील आदींनी दिला. मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.