Dhule Silver Rate Hike : शोभा वाढविणारी चांदी 94 हजार पार; सोन्याचे दिवस आल्याने दरात मोठी वाढ

Dhule News : स्थानिक सराफा बाजारात चांदीने आतापर्यंतची उच्चांक गाठला आहे. तिच्या दराने सुमारे ९४ हजारांचा (जीएसटी अतिरिक्त) पल्ला पार केला आहे.
Silver Rates Hike
Silver Rates Hikeesakal
Updated on

Dhule News : स्थानिक सराफा बाजारात चांदीने आतापर्यंतची उच्चांक गाठला आहे. तिच्या दराने सुमारे ९४ हजारांचा (जीएसटी अतिरिक्त) पल्ला पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्यापेक्षा चांदीच्या भावात अधिक वाढ होत आहे. येथे २८ मेस तर त्यात थेट तीन हजार १०० रुपयांची वाढ होऊन ती ९४ हजार ६०० रुपयांवर पोचली. त्यामुळे चांदी आता लाखाच्या घराकडे वाटचाल करीत असल्याची स्थिती आहे.

मेमधील दरात चांदीने ११.२९ टक्क्यांची तेजी घेतली. स्थानिक सराफा बाजारात भावात चढ-उतार होऊन चांदी आता ९० हजारांवर स्थिरावली आहे. मे संपायला असताना चांदीच्या दरात तब्बल ११.२९ टक्के वाढ साधली गेली. मेच्या पहिल्या दोन आठवड्यांत चांदीच्या दरात झालेली वाढ ही चालू वर्षातील एकूण वाढीच्या ६० टक्के आहे.

२०२४ मध्ये आतापर्यंत चांदीच्या दरात प्रतिकिलो १६ हजार रुपयांची म्हणजेच २१ टक्क्यांची वाढ झाली. १५ मेस ८४ हजार ८०० रुपये प्रतिकिलो असलेल्या चांदीच्या दराने २८ मेस तब्बल ९४ हजार ६०० रुपयांपर्यंत उसळी घेतली. यादरम्यान १८ मेस ८६ हजार ५०० रुपयांवर दर स्थिर होता. दलालांनी चांदीची खरेदी वाढविल्याने तिचे दर वाढत असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.

बाजारात मोठी तेजी

एकाच दिवसात चांदी साडेसहा हजार रुपयांनी वाढून ९४ हजार ६०० रुपयांवर पोचली. १८ मेपासून सराफा बाजारात मोठी तेजी राहिली. चांदीच्या दराने विक्रमी पातळी गाठली. चांदीचा दर गेल्या आठवड्यात पाच हजार ८०० रुपयांनी वाढून ९२ हजार ३०० रुपये प्रतिकिलो झाला. दोन वर्षांतील चांदीची ही सर्वात मोठी वाढ मानली गेली. यापूर्वी २०२२ मध्ये एकाच दिवसात तिच्या किमती ८.५ टक्के वाढल्या होत्या. (latest marathi news)

Silver Rates Hike
Dhule Lok Sabha: मतमोजणीची प्रक्रिया 17 फेऱ्यांत होणार पूर्ण! प्रशासन सज्ज; विधानसभा क्षेत्रनिहाय 20 टेबलांवर होणार मतमोजणी

यापूर्वी १७ मेस चांदीने ८६ हजार ५०० रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. या महिन्यात चांदीच्या किमतीत १६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. चांदीची आभूषणे, विविध वस्तू या सण-उत्सव, घरगुती कार्यक्रमात शोभा वाढवीत असतात. त्यास मोठे महत्त्व आहे. पूजेवेळेही चांदीच्या वस्तूंचा वापर होत असतो. त्यामुळे भुरळ घालणारी चांदी दरात लाखाच्या घराकडे वाटचाल करत असताना सर्वसामान्यांसाठी ती महागडी ठरणार असल्याचे चित्र दिसून येते.

स्थानिक चांदी दर

(जीएसटी अतिरिक्त)

तारीख....प्रतिकिलो

* २८ मे....९४,६००

* २७ मे....९१,५००

* २६ मे....८९,८००

* २५ मे....८९,८००

* २४ मे....९०,०००

* २३ मे....९२,३००

* २२ मे....९२,०००

* २१ मे....९२,०००

* २० मे....९०,०००

* १९ मे....९०,०००

* १८ मे....८६,५००

Silver Rates Hike
Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघाचा सर्जन कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.