Dhule News : शिक्षकांअभावी विद्यार्थी दिशाहीन! साक्री तालुक्यातील स्थिती; शैक्षणिक नुकसानीची भीती

Dhule : गांभीर्याची बाब म्हणजे अनेक प्राथमिक शाळांमध्ये भाषा, समाजशास्त्र आणि विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्याचे निरीक्षण समोर आले आहे.
teacher
teachersakal
Updated on

Dhule News : राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता हा नवा विषय नाही. पण, गांभीर्याची बाब म्हणजे अनेक प्राथमिक शाळांमध्ये भाषा, समाजशास्त्र आणि विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्याचे निरीक्षण समोर आले आहे. नोकर भरती बंद असल्यामुळे साक्री तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात चक्क ७२ प्राथमिक शिक्षक, आठ विषय शिक्षक, तीन मुख्याध्यापक, ३२ केंद्रप्रमुख व सहा विस्तार अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. (Sakri taluka where students are directionless due to lack of teachers)

तालुक्यात शाळा आणि विद्यार्थीही आहेत. पण, शिक्षक मिळेना अशी स्थिती आहे. आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू असून, आवश्यक ठिकाणी पदे भरण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे. अलिकडे प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. विविध प्रकाराचे खेळ, नवनवीन विषय गिरवले जात असल्याचे सकारात्मक चित्र असताना शैक्षणिक विभागाचा गाडा तोडके कर्मचारी ओढत असल्याचे वास्तव आहे.

शिवाय इतर शासकीय उपक्रमांसह पंचायत समिती स्तरावर दररोज इतर तत्सम शैक्षणिक कागदपत्रे सादरीकरण करण्याचा भारही शिक्षकांवर लादल्यावर अध्यापनासाठी किती वेळ देतील, हा खरा प्रश्‍न आहे. साक्री तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४४२ प्राथमिक शाळांमध्ये सुमारे २९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

साक्री तालुक्यात अनेक ठिकाणी भाषा, समाजशास्त्र व विज्ञान विषयाचे शिक्षक नसून ते काम इतर शिक्षकांवर सोपवल्याने शिक्षणाचा दर्जा फारसा सुधारण्याची सुतराम शक्यता नाही. शासनाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’सारखा पुरस्कारही दिला आहे. यातून शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी स्पर्धा वाढावी, हा शासनाचा हेतू आहे.

नवीन भरती प्रक्रिया रखडली

एकीकडे शहरासह ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये, विद्यार्थी संख्या वाढवी म्हणून शासकीय यंत्रणा पोषण आहार योजना, उपस्थिती भत्ता, मोफत गणवेश, बुट-पायमोजे, आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना यासारखे उपक्रम राबवित असते. तर दुसरीकडे नवीन भरती प्रक्रिया बंद ठेवून काय हेतू साध्य करत असेल, हा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. (latest marathi news)

teacher
Dhule News : विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाचे वेध; 15 जून शाळेचा पहिला दिवस

दप्तराचे ओझे कमी होणार

सध्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न दिसून येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांस भाग एक ते चार अशी चार पुस्तके दिली जात आहे. यात दप्तराचे ओझे कमी करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. शिवाय, प्रत्येक विषयाला वह्यांची पाने जोडली आहेत. यातून विद्यार्थ्यांना लवकर लिहण्याची सवय लागणार आहे. शिकवण्याच्या पद्धतीत प्रथम सत्रात भाग एक, दोन, तर दुसऱ्या सत्रात भाग तीन व चार यांचा समावेश असणार आहे.

भाषा, विज्ञान शिक्षकांची गरज

नव्या भरती प्रक्रियेत गणिताच्या शिक्षकांना प्राधान्य देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांमध्ये गणित, भाषा आणि विज्ञानाच्या शिक्षकांची गरज अधिकच अधोरेखित झाली आहे. विद्यार्थ्यांची तार्किक आणि आकलन क्षमतांच्या विकासासाठी हे दोनही विषय महत्वपूर्ण आहेत.

मात्र, याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याची भावना प्राथमिक शिक्षकांनी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांवर लवकरच भरती केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांनी दिली. त्यात बहुतांश गणित विषयाच्या शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.

अजून चिंताजनक बाब म्हणजे राज्यात गणित विषयातील टीईटी परीक्षा उत्तीर्ण (पेपर-२) शिक्षकांची संख्या खूपच कमी आहे. परिणामी, भरती प्रक्रिया राबवूनही शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यात सहावीपासून पुढे बीएड पदवीधारक विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यामुळे गणित विषयाला शिक्षक कोठून आणणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

teacher
Dhule News : धुळ्यातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर; पोलिस अधीक्षक धिवरेंकडून चिंता

तालुक्यातील रिक्त पदे

प्राथमिक शिक्षक : ७२

विषय शिक्षक : ८

मुख्याध्यापक : ३

केंद्रप्रमुख : ३२

विस्तार अधिकारी : ६

विविध माध्यमांच्या शाळा

खासगी अनुदानित शाळा : ११५

शासकीय आश्रमशाळा : १५

अनुदानित आश्रमशाळा : १९

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा : ४४२

teacher
Dhule News : धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यावर चिंतेचे ढग! साक्री, शिरपूर व शिंदखेड्यात पावसाची प्रतीक्षा कायम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.