Dhule Crime News : सोनवणेची न्यायालयीन कोठडीत रवानगी; घटनास्थळावरून पोलिसांना जप्त केले लाकडी दांडके

Dhule Crime : संशय घेणाऱ्या प्रियकराचा प्रेयसीने दीपक मालचे याच्या गुप्तांगावर वार करीत खून केल्याची घटना शेवाडे येथे रात्री घडली.
Dhule Crime
Dhule Crime esakal
Updated on

चिमठाणे : मनापासून प्रेम करूनही प्रेयसीवर संशय घेणाऱ्या प्रियकराचा प्रेयसीने दीपक मालचे याच्या गुप्तांगावर वार करीत खून केल्याची घटना शेवाडे (ता. शिंदखेडा) येथे सोमवारी (ता. १६) रात्री घडली. मंगळवारी (ता. १७) सकाळी ती उघडकीस आली. पोलिसांनी प्रेयसीला काही तासांत अटक केली होती. तिला गुरुवारपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी (ता. २०) प्रेयसीला शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. (Sonawane murder case criminals sent to judicial custody )

प्रेयसीला शुक्रवारी सकाळी शेवाडे येथील घटनास्थळी नेण्यात आले होते. शेवाडे येथे दीपक मालचे (वय २५) याचा मृतदेह गावातील जुन्या आदिवासी वस्तीलगत असलेल्या शेताच्या बांधालगत झाडाझुडपांमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली. दीपक मालचे याचे गावातील संशयित रेखा सोनवणे (वय २४) हिच्याशी अनैतिक संबंध होते. दीपक मालचे यांची पत्नी माहेरी बाळंतपणासाठी गेली असून, त्याला दोन मुले व एक मुलगी, तर रेखा सोनवणे ही दोन वर्षांपासून माहेरी शेवाडे येथील आईकडे राहात असून, तिलाही दोन मुले व एक मुलगी आहे.

Dhule Crime
Dhule Crime News : 5 तासांतच चोरटा ताब्यात; चाळीसगाव रोड पोलिस पथकाची कामगिरी

दीपक मालचे याचा खून करण्यात आला त्या घटनास्थळी शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास प्रेयसी रेखा सोनवणे हिला शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब थोरात, सहाय्यक निरीक्षक हनुमान गायकवाड, उपनिरीक्षक गुलाब ठाकरे, हवालदार अनंत पवार, प्रशांत पवार, कैलास चौधरी, विशाल सोनवणे, अशोक धनगर, महिला कर्मचारी रंजनी पाटील, वर्षा गोपाळ, साक्षी पवार, माधुरी चव्हाण, वैशाली वाहुळे घेऊन गेले असता, सोनवणे हीने खून करण्यात आलेल्या ठिकाणी असलेल्या काटेरी झुडपातून लाकडी दांडके काढून दिले.

प्रेयसीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

संशयित प्रेयसी रेखा सोनवणे हिची शुक्रवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तिला दुपारी शिंदखेडा येथील न्यायालयात तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी हजर केले असता, तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याने तिची रवानगी धुळे येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

Dhule Crime
Dhule Crime : हाडाखेडला अवैध सुगंधित तंबाखू जप्त; कारवाईत वाहनासह 10 लाख 82 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.