कापडणे : धुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतीशिवारात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिवळा मोझॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक वायरस या विषाणूंमुळे, तर हिरवा मोझॅक हा सोयाबीन मोझॅक वायरस या विषाणूमुळे होतो.
कडधान्य आणि तण ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीनमध्ये पंधरा ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. (Soybean virus mosaic outbreak Farmers in district worried)