Dhule SSC Exam Result : दहावीतील मॅचमध्ये चौघे सामनावीर! जिल्ह्याचा दहावीचा निकाल 94.31 टक्के

Dhule News : जिल्ह्यात शिरपूर तालुक्याचा सर्वाधिक ९७.०४ टक्के निकाल लागला. परीक्षेत यंदाही मुलीच अव्वल ठरल्या.
Ulhas Ratnaparkhi, director of Hasti School and Hasti Bank, congratulating Prachi Deore, a student of Hasti School, who stood joint first in Dhule district with 98 percent marks in the 10th class examination.
Ulhas Ratnaparkhi, director of Hasti School and Hasti Bank, congratulating Prachi Deore, a student of Hasti School, who stood joint first in Dhule district with 98 percent marks in the 10th class examination.esakal
Updated on

Dhule SSC Exam Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल सोमवारी (ता.२७) दुपारी घोषित झाला. यात यंदा धुळे जिल्ह्याचा ९४.३१ टक्के निकाल लागला. शिरपूर तालुक्याने निकालात बाजी मारली. जिल्ह्यात शिरपूर तालुक्याचा सर्वाधिक ९७.०४ टक्के निकाल लागला. परीक्षेत यंदाही मुलीच अव्वल ठरल्या. (Dhule SSC Exam Result Four match winners with 98 percent)

यंदाच्या निकालाचे वैशिष्ये म्हणजे तब्बल चार विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येण्याचा मान मिळविला. दोंडाईचा येथील हस्ती स्कूलची विद्यार्थिनी प्राची भाऊसाहेब देवरे, धुळ्यातील चावरा हायस्कूलची योगिता चंद्रकांत पाटील, शिरपूर येथील आरसीपी इंग्लिश मीडिअम स्कूलची कनक पाटील व आरसीपी विद्यालयाचा दीपक पवार यांचा यात समावेश आहे. या चारही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ९८.०० टक्के गुण प्राप्त केले.

यंदा दहावीची परीक्षा ९ ते २६ मार्चदरम्यान झाली. या परीक्षेसाठी धुळे जिल्ह्यातून नियमित, पुनर्परीक्षार्थी, खासगी, दिव्यांग असे एकूण २८ हजार ६८३ परीक्षार्थींनी नोंदणी केली. त्यातील २८ हजार ३९७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी २६ हजार ६९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १४ हजार ५४३ (९३.०१ टक्के) मुले व १२ हजार १५४ (९५.२३ टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णांचे हे एकत्रित प्रमाण ९४.०१ टक्के इतके आहे. खासगी परीक्षार्थी ८८.७८ टक्के, तर पुनर्परीक्षार्थींचा ६१.८४ टक्के निकाल लागला.

उत्तीर्णांची टक्केवारी

जिल्ह्यातील उत्तीर्ण मुले-मुलींची टक्केवारी अशी : धुळे ग्रामीण-९१.४५/९२.३६, साक्री-९३.७८/९५.९७, शिरपूर-९६.७२/९७.४६, शिंदखेडा-९२.६७/९४.१४, धुळे शहर-९३.०५/९६.८०. एकूण ९३.४२/९५.४० टक्के मुले-मुली उत्तीर्ण झाले. गुणवत्तेत १३ हजार १४७, प्रथम श्रेणीत नऊ हजार ३९, द्वितीय श्रेणीत तीन हजार ६५२ आणि व ६१० परीक्षार्थी पास झाले.

उत्तीर्णांमध्ये मुलांचे प्रमाण ९३.४२ टक्के, तर मुलींचे प्रमाण ९५.४० टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल शिरपूर तालुक्याचा ९७.०४ टक्के लागला आहे. तर सर्वांत कमी निकाल धुळे ग्रामीणचा ९१.८४ टक्के लागला. साक्री तालुक्याचा ९४.८५, धुळे शहराचा ९४.८१ तर शिंदखेडा तालुक्याचा ९३.३० टक्के निकाल लागला. (latest marathi news)

Ulhas Ratnaparkhi, director of Hasti School and Hasti Bank, congratulating Prachi Deore, a student of Hasti School, who stood joint first in Dhule district with 98 percent marks in the 10th class examination.
Jalgaon SSC Result: दहावीच्या परीक्षेतही मुलीच आघाडीवर! नाशिक विभागात जळगाव जिल्हा तिसऱ्या स्थानी; 94.88 टक्के निकाल

गुण पडताळणीसाठी मुदत

दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी २८ मे ते ११ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. मार्च-२०२४ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.

छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात, विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील.

ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. जुलै-ऑगस्ट-२०२४ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी ३१ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थी (तालुकानिहाय स्थिती)

तालुका...मुले...मुली...एकूण

-धुळे ग्रामीण...३,२५२...२,४४४...५,६९६

-साक्री...२,८८३...२,७९०...५,६७३

-शिरपूर...२,६५४...२,११२...४,७६६

-शिंदखेडा...२,३२८...१,७५४...४,०८२

-धुळे शहर...३,२५८...२,९७३...६,२३१

-एकूण...१४,३७५...१२,०७३...२६,४४८

तालुकानिहाय निकाल

तालुका...टक्के

-धुळे ग्रामीण...९१.८४

-साक्री...९४.८५

-शिरपूर...९७.०४

-शिंदखेडा...९३.३०

-धुळे शहर...९४.८१

Ulhas Ratnaparkhi, director of Hasti School and Hasti Bank, congratulating Prachi Deore, a student of Hasti School, who stood joint first in Dhule district with 98 percent marks in the 10th class examination.
SSC Exam Result : ६० वर्षाच्या आजीने मिळविले चक्क ६० टक्के गुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.