Dhule Accident : एसटी- ट्रक अपघातात तिघांचा नगावजवळ मृत्यू; कंडक्टरचा समावेश

Dhule Accident : शहरालगत नगावबारी परिसरातील मुंबई- आग्रा महामार्गावरील एका महाविद्यालयाजवळ मिनी ट्रक, टेम्पो (४०७) आणि एसटीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला.
Accident Damaged ST.
Accident Damaged ST.esakal
Updated on

धुळे : शहरालगत नगावबारी परिसरातील मुंबई- आग्रा महामार्गावरील एका महाविद्यालयाजवळ मिनी ट्रक, टेम्पो (४०७) आणि एसटीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यात कंडक्टरचा समावेश असून बसचालकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना बुधवारी (ता.९) रात्री नऊनंतर घडली. महामार्गावर बंदस्थितीत मिनी ट्रक (एमएच १९ एस १२४९) उभा होता. त्याला नेण्यासाठी टेम्पो अर्थात टोचण वाहन (एमएच १८ एए ९९४५) मागविण्यात आले. ( ST Three killed in truck accident near Nagaon including conductor )

मिनी ट्रकमधून ऑक्सिजनचे सिलिंडर टोचण वाहनात टाकले जात होते. या वाहनांचा एसटी चालकास अंदाज आला नाही. त्यामुळे एसटीने मागून धडक दिल्यानंतर कंडक्टर काच फुटून बाहेर पडला आणि तो एसटीच्या चाकाखाली येऊन ठार झाला. धडकेमुळे समोरील वाहनांमधील दोघांचाही मृत्यू झाला. कंडक्टर नरेंद्र पाटील, टोचण वाहनाचे कर्मचारी शिवराज पावरा, सुभाष सुडके यांचा घटनेत मृत्यू झाला.

Accident Damaged ST.
Dhule Accident: पिकअप व्हॅन आणि इको कारची समोरासमोर धडक, पाच जणांचा जागीच गेला जीव

एसटी (एमएच २० बीएल ३१२६) धुळ्याकडून शिंदखेड्याकडे जात असताना अपघात झाला, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. या घटनेत बसमधील सात ते आठ जण जखमी झाले. त्यांच्यासह एसटी चालक रिंकू गोसावी यांच्यावर जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू होते. अपघातानंतर मुंबई- आग्रा महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Accident Damaged ST.
Dhule Accident News: अपघातात जखमी झालेल्या लामकानीच्या महिलेचा मृत्यू! तीन वर्षांपूर्वी मुलाचे झाले होते निधन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.