Dhule News : धुळे-पुणे रेल्वे सुरू करावी, रिझर्व्हेशनची वेळ सकाळी आठ ते रात्री आठदरम्यान अशी पूर्णवेळ करावी यासह इतर विविध मागण्यांवर धुळे रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा झाली. धुळे स्टेशन सल्लागार समितीची बुधवारी (ता. २४) धुळे रेल्वे स्टेशन येथे बैठक झाली. सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (कोचिंग) भुसावळ श्री. ननावरे, सीएससीआय कवाडे. (Start Dhule Pune train)
धुळे रेल्वे सल्न्लागार समिती सदस्य हेमंत मराठे, मनोज वाघ, नितीन ठाकूर, नितीन देवरे, दीपक अहिरे, ज्योत्स्ना पाटील, गोपीचंद पाटील, हर्शल भामरे तसेच पोलिस उपनिरीक्षक आर. के. सिंग, धुळे स्टेशन प्रबंधक सुनील महाजन, सीआरएस हेमराज ठाकूर आदी उपस्थित होते. प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
यात धुळे-पुणे रेल्वे सुरू करावी, रिझर्व्हेशन टायमिंग सकाळी आठ ते रात्री आठ अशी पूर्णवेळ असावी, धुळे रेल्वे स्टेशनवरील टॉयलेट बाथरूम त्वरित सुरू करण्यात यावे, सकाळी धुळे-चाळीसगाव रेल्वे ही नाशिक इगतपुरीपर्यंत करावी. (latest marahi news)
रविवारी अॅडव्हान्स बुकिंगची सुविधा असावी, मुंबई-धुळेची वेळ दुपारी बाराऐवजी चारची करावी, मुंबई-धुळे परतीला जवळपास नऊ तासांचा वेळ लागतो. चाळीसगावजवळ स्लो झाल्याने जवळपास दोन तासांचा अधिकचा वेळ लागतो तो कमी करावा.
गेट नंबर २२ (हॉटेल सम्राटजवळ) येथे अंडर बायपास करण्यात यावा. सल्लागार समितीच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात आदी मागण्यांवर चर्चा झाली. वरिष्ठ स्तरावर याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.