चिमठाणे : सोलापूर- अंकलेश्रवर राज्य महामार्ग क्रमांक एकची सध्याची अवस्था ही अतिशय दयनीय झाली आहे. अवघा सात मीटर रुंदीचा हा राज्यमार्ग कधी कधी खड्यात रस्ता तर कधी साइट पट्या खोल असलेल्या कारणावरून चर्चेत असतो. आता हा राज्यमार्ग चिमठाणे (ता.शिंदखेडा) गावाजवळ काटेरी झुडपेच रस्त्याच्या मधोमध आल्याने अपघाताचे कारण ठरत आहे.
काटेरी झुडपामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्य महामार्ग हा शिंदखेडा व दोंडाईचा सार्वजनिक बांधकाम उपविभागातंर्गत येणाऱ्या मार्गाच्या दुरुस्ती ऐवजी संबंधित विभाग 'बघ्याची भुमिका' असल्याने रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. (Dhule State Highway condition of Songir Dondai bad)
सोलापूर- अंकलेश्रवर राज्य महामार्गावर क्रमांक एकचे धुळे शहरापर्यत रुंदीकरण झाले आहे. पुढे तो सोनगीरपर्यंत महामार्ग तीनला जोडला जातो. सोनगीर- शहादा पर्यंत सात मीटर रुंदीचा रस्ता आहे. आता या रस्त्याला राज्य शासनाने दहा मीटर रुंदीचा होणार असल्याची प्रक्रीया सुरु केली आहे.
नव्याने होणारा रस्ता हा सिमेंट काँक्रिटचा असणार आहे. दहा मीटरच्या रस्त्याला आता कुठे तरी मंजुरी मिळाली आहे. मात्र, सोनगीर ते दोंडाईचा हा ३६ किलोमीटरच्या रस्त्यावर काटेरी झुडपे व साइटपट्या या एक - दीड फुट खोल असल्याने समोरासमोर दोन वाहने आल्यास वाहन चालकाला या मार्गावरुन वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. (latest marathi news)
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोंडाईचा व शिंदखेडा उपविभागाने या रस्त्यावरील काटेरी झुडपे काढून व साइटपट्याचा भराव करावा अशी मागणी वाहन चालकांसह रस्त्यावरील गावातील ग्रामस्थांनी मागणी केली आहे .
"सोनगीर- दोंडाईचा रस्त्यावरील चिमठाणे गावाजवळील बुराई नदीवरील पुलाच्या आजूबाजूला काटेरी झुडपे रस्त्यावर आल्याने समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने वाहन चालकांमध्ये नेहमी वाद होतात. तसेच अनेकदा वाहने एकामेकांवर धडकत अपघात होत आहे."
- शंकर पाटील, ग्रामस्थ चिमठाणे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.