Dhule News : शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व रेबीज लसीकरणाच्या कामाला आता नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता अडसर ठरत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न सोडवू न शकलेल्या धुळे महापालिका प्रशासनाला आता आचारसंहितेनंतर तरी मार्ग सापडेल व जीवघेण्या समस्येतून धुळेकरांची सुटका करण्याचा किमान प्रयत्न सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. (Sterilization of dogs Dhule municipality)
धुळे शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांची समस्या अनेक वर्षे कायम आहे. मागील पाच वर्षांत अर्थात महापालिकेतील त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षाच्या पदाधिकारी, नगरसेवकांनीही याप्रश्नी अनेकदा आवाज उठविला.
मात्र, हा प्रश्न सोडविण्यात त्यांनाही यश आले नाही. दरम्यान, आता काही दिवसांपूर्वी या मोकाट कुत्र्यांनी एका बालिकेचा बळी घेतला. त्यानंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. विविध पक्ष, संघटनांनी धुळे महापालिका प्रशासनाला याबाबत जबाबदार धरत तक्रारी केल्या, इशारे दिले.
इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी यांनीही मोकाट कुत्र्यांप्रश्नी मनपा प्रशासनाला धारेवर धरत याप्रश्नी महापालिकेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला. या इशाऱ्याच्या अनुषंगाने मनपाच्या सार्वजनिक स्वच्छता विभागातर्फे श्रीमती परदेशी यांना पत्र देत यापूर्वी याप्रश्नी केलेल्या कार्यवाहीसह यापुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. या कार्यवाही मात्र, नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता अडसर येत असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
तक्रारीमुळे काम बंद
मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरण करण्याकामी संतुलन जीवकल्याण (जयपूर) या संस्थेला कार्यादेश देण्यात आला होता. मात्र, आधार प्राणीरक्षक संस्थेच्या सदस्यांनी संतुलन जीवकल्याण संस्थेच्या कामकाजाबाबत आक्षेप नोंदविला. त्याबाबत भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे हे काम बंद करण्यात आले. ()
फेरनिविदेची प्रक्रिया
शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या प्रमाणाबाबत सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांचे निवेदन मनपा प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. मात्र, कायद्यानुसार मोकाट व भटक्या कुत्र्यांना मारण्यास बंदी आहे. कायद्यानुसार या कुत्र्यांना पकडून त्यांची संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यानुसार धुळे महापालिका क्षेत्रातील मोकाट व भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची उत्पत्ती थांबविणे, त्यांना मर्यादित ठेवण्यासाठी ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्राम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अनुषंगाने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी सर्व्हे नंबर-२०७ मध्ये शेड उभारण्याकामी बांधकाम विभागामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने संबंधित विभागातर्फे फेरनिविदा काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
त्यामुळे सहकार्य करावे
दरम्यान, सद्यःस्थितीत नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने फेरनिविदेची कार्यवाही करण्यास विलंब होत आहे. ७ जुलैला आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरणाची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारे धुळे महापालिकेस कुलूप ठोकू नये, मनपा प्रशासनास सहकार्य करावी, अशी विनंती महापालिकेतर्फे इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती परदेशी यांना केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.