धुळे : शहरात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, अशा नोटिसा धुळे महापालिकेने संबंधित होर्डिंग एजन्सी/ठेकेदारांना बजावल्या आहेत. संबंधित एजन्सींकडून स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर महापालिकादेखील आपल्या स्तरावरून या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पडताळणी करून घेणार आहे. दरम्यान, संबंधित एजन्सींकडे होर्डिंगच्या करापोटी असलेली थकबाकी भरण्यासह नोटिशीतून बजावण्यात आले आहे. (Structural audit of vertical hoardings in city)