Dhule News : कृषिकन्यांकडून जनावरांचे लसीकरण

Dhule : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सोनशेलू गावात जनावरांची लसीकरण मोहीम राबविली.
Students of Agriculture College participating in Animal Vaccination Campaign.
Students of Agriculture College participating in Animal Vaccination Campaign.esakal
Updated on

Dhule News : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सोनशेलू गावात जनावरांची लसीकरण मोहीम राबविली. या मोहिमेत त्यांनी गावातील शेकडो जनावरांचे लाळखुरकत आजार प्रतिबंध (एफएमडी) लसीकरण केले.

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमानिमित्त सोनशेलू गावात गेल्या. (animal vaccination campaign)

त्यांनी महाविद्यालयाचे संस्थापक सरकारसाहेब रावल, शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल, महाविद्यालयाचे प्राचार्य रूपसिंग बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील जनावरांच्या आरोग्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली.

त्यानंतर पशुवैद्यकीय विभागाच्या डॉ. एस. एस. शिंदे, डॉ. एस. बी. पुपळवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एफएमडी लसीकरण मोहीम राबविली. यासाठी त्यांना डॉ. पी. एम. चव्हाण, डॉ. राहुल गिरासे, डॉ. अतुल माळी, डॉ. भटू सोनवणे यांनी सहकार्य केले. (latest marathi news)

Students of Agriculture College participating in Animal Vaccination Campaign.
Dhule Child Marriage : गोताणे गावातील बालविवाह रोखला; तक्रारीनंतर तत्काळ कार्यवाहीमुळे प्रशासनाला यश

मोहिमेत कृषिकन्यांनी सोनशेलू गावातील ४० बैल, २३ गायी, २० वासरे, २४ म्हशी आदी जनावरांचे लसीकरण केले. तसेच दोन गायींची गर्भ तपासणी केली. मोहिमेत कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी विशाखा विलास बोडके, भाग्यश्री घरटे, विशाखा गावित, रितिका गिरासे, वैष्णवी पवार, महेश्वरी पिंपळे, साक्षी रौंदळ यांचा सहभाग होता.

सरपंच प्रियांका बडगुजर, धीरज बडगुजर, दिलीपसिंग गिरासे, हरसिंग गिरासे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मोहिमेबद्दल सरकारसाहेब रावल, आमदार जयकुमार रावल, प्राचार्य राजपूत यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.

Students of Agriculture College participating in Animal Vaccination Campaign.
Dhule Polio Vaccination : पोलिओ डोसपासून एकही बालक वंचित नको : जिल्हाधिकारी गोयल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.