Dhule Summer Heat : वाढत्या उष्णतेमुळे फूलगळतीचे संकट

Dhule News : यंदा पाणी टंचाई, दुष्काळी स्थितीचा फळबागांनाही फटका बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे सुमारे पन्नास टक्के फूलगळतीचे संकट उभे ठाकले आहे.
Pomegranate gardens covered with white mesh netting as protection from the rising sun in Shiwar.
Pomegranate gardens covered with white mesh netting as protection from the rising sun in Shiwar.esakal
Updated on

म्हसदी : यंदा पाणी टंचाई, दुष्काळी स्थितीचा फळबागांनाही फटका बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे सुमारे पन्नास टक्के फूलगळतीचे संकट उभे ठाकले आहे. तोडक्या पाण्यावर ठिबक सिंचनाद्वारे जतन केलेल्या फळबागा जगविण्यासाठी बागायतदार शेतकरी आटापिटा करत आहेत. यंदा तापमानाने चाळिशी पार केली आहे. बेहेड, काळगाव शिवारात शेतकऱ्यांनी महागड्या पांढऱ्या नेट कापडाने बागांना आच्छादन केले आहे. यातून डाळिंब बागांचा पन्नास टक्के उष्णतेपासून बचाव होणार आहे. (Dhule Summer Heat)

अलीकडे साक्री तालुक्यात बहुतेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला छेद देत फळबाग शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. सध्या हंगामात डाळिंब बागा फुलोरावस्थेत आहेत. काही ठिकाणी फळावर आलेल्या बागांवर सनबर्निंगचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. पाणीटंचाई, वाढत्या उष्णतेचा बागांना फटका बसू नये म्हणून पांढऱ्या जाळीदार नेटने आच्छादन केले जात आहे.

बेहेड (ता. साक्री) येथील शिवारात काळगाव येथील कृषिभूषण शेतकरी संजय निंबाजी भामरे यांनी सुमारे दहा एकर डाळिंब बागेत आच्छादन केले असून अजून तीस एकर बागेत आच्छादन केले जाणार आहे. चाळीस अंश सेल्सिअस तापमानामुळे मोठ्या प्रमाणात फूलगळती होते. ही फूलगळती रोखण्यासाठी बागांना पश्चिम-उत्तर बाजूने केले आच्छादन करणार असल्याची माहिती त्यांनी ‘सकाळ’ ला दिली.

जानेवारीपासून डाळिंबाचा आंबिया बहार भरणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. यंदा डाळिंब, सीताफळ, शेवगा व अन्य भाजीपाला पिकास पाणी टंचाईबरोबरच वाढत्या उन्हाचा तडाखा बसला आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याची काटकसर करत आंबिया बहार घेण्याचे धाडस केले आहे.

मध्यंतरी पोषक वातावरणामुळे बागांचे सेटिंग चांगले झाल्याचे चित्र होते. त्यामुळे कळी निघण्यास अडचणी आल्या नाहीत. अनेक भागात बागा फुलोरावस्थेत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी पातळी खालावत असून बाहेर सूर्य आग ओकत असल्याने तापमानाने चाळिशी पार केली आहे. अजून सुमारे अडीच महिने पाणी टंचाई व तीव्र उष्णतेचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. (latest marathi news)

Pomegranate gardens covered with white mesh netting as protection from the rising sun in Shiwar.
Dhule Lok Sabha Constituency : दहिते कुटुंबीयांच्या उमेदवारीकडे लक्ष

पाणी समस्येचा डोंगर

अलीकडे साक्री तालुक्यात बहुतांश ठिकाणी फळशेती, भाजीपाला शेतीकडे शेतकरी वळले आहेत. फळशेतीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच उंचावले असले तरी शेती व्यवसाय बेभरवशाचा झाल्याने बागायतदार शेतकरीही हतबल झाला आहे. कारण फळ शेती करणे प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.

वातावरणातील बदल, वाढते तापमान आणि अवकाळी पावसामुळे फळशेतीला सर्वाधिक फटका बसत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. दुसरीकडे पिकविलेला माल‌ विक्रीसाठी वेळेवर बाजारपेठेत नेणे वा खासगी व्यापाऱ्यांना बांधावर बोलावून देताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येतात. अशावेळी पिकविणे सोपे विकणे अवघड’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते.

फळ संख्या घटीची भीती

अलीकडे सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे फळ पीक धोक्यात आहे. यंदा जलस्रोत आटल्यामुळे तापमानाच्या झळा अधिकच तीव्र जाणवत असल्याची माहिती जाणकार शेतकऱ्यांनी दिली. कडक उन्हात प्रामुख्याने पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात.

Pomegranate gardens covered with white mesh netting as protection from the rising sun in Shiwar.
Dhule Lok Sabha Constituency : दररोज नवे चेहरे, नव्या नावांमुळे ‘मविआ’ इच्छुकांमध्ये अस्वस्थता

डाळिंबाला बत्तीस ते पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान पोषक मानले जाते. यंदा ‌मार्च महिन्याच्या अखेरपासून तापमानाने चाळिशी पार केली आहे. वाढलेल्या तापमानामुळे फूलगळतीचे प्रमाण वाढले आहे. यातून झाडावरची फळांची संख्या कमालीची घटणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

"शेतकऱ्यांनी डाळिंब बागांना पश्चिम-उत्तर बाजूने ‘एल’ आकाराचे हिरवाईचे कुंपण केले पाहिजे. पश्चिम-उत्तर बाजूनेच एल आकारात पांढऱ्या जाळीदार नेटने आच्छादन केल्यास उन्हापासून बचाव होऊन फूलगळ होणार नाही." - संजय निंबाजी भामरे, कृषी भूषण, आदर्श शेतकरी, काळगाव (ता.साक्री)

"पाण्याशिवाय शेती नाही, प्रगती नाही. पाण्याची पातळी इतकी खोल जाईल, याचा अंदाज नव्हता. लाखो रुपये खर्च करून सीताफळ, डाळिंब बागा उभ्या केल्या आहेत. केवळ जलस्तर खोल गेल्याने बागा जतन कशा कराव्यात, हा प्रश्न आहे."- भटू नामदेव बेडसे, फळबागातदार शेतकरी, काकाणी (ता.साक्री)

Pomegranate gardens covered with white mesh netting as protection from the rising sun in Shiwar.
Jalgaon News : अमळनेर बाजार समितीत 20 हजार क्विंटल मालाची आवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.