Dhule Traffic Rules : शहरातील वाहतूक सुरळीत होणे, वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली. हा आदेश मंगळवार (ता. २८)पासून लागू झाला असून, तो पुढील आदेशापर्यंत अमलात राहील. ( no entry for heavy vehicles in city )
या मार्गावर प्रवेशबंदी
इंदूरकडून येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना नगावबारी चौक, देवपूरपासून धुळे शहरात, साक्री रोड सुरतकडून येणाऱ्या अवजड वाहनांना कृष्णाई हॉटेल, साक्री बायपासपासून धुळे शहरात, मुंबईकडून धुळे शहरात गुरुद्वाराकडून येणाऱ्या अवजड वाहनांना नवीन डीमार्टपर्यंत प्रवेश राहील, त्यापुढे प्रवेशबंदी राहील. (latest marathi news)
चाळीसगाव क्रॉस, शंभर फुटी कॉर्नरपासून अवजड वाहनांना धुळे शहरात, पारेाळा चौफुली, कृषी महाविद्यालयापासून अवजड वाहनांना धुळे शहरात, तसेच बिलाडी रोड, जुने धुळेपासून धुळे शहरात, वरखेडी रोडपासून धुळे शहरात, वडजाई रोडपासून धुळे शहरात, चितोड रोडपासून धुळे शहरात, गोंदूर रोडपासून धुळे शहरात, नकाणे रोडपासून धुळे शहरात सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत प्रवेशबंदी असेल.
यांना अपवाद
अवजड वाहनांना प्रवेशबंदीचा हा आदेश शासकीय वाहने तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बस, स्कूल बस यांना लागू राहणार नाही. तसेच शहरात किराणा, भुसार व इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी दुपारी बारा ते चार वाजेदरम्यान आदेशात सूट देण्यात येत आहे. बंदीच्या वेळेव्यतिरिक्त अवजड वाहनांची वाहतूक नेहमीप्रमाणे राहील, असे जिल्हा पोलीस अधीक्षक धिवरे यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.