Dhule News : तापी जलवाहिनीला 17 ठिकाणी गळती! 8 ऑगस्टला दुरुस्ती; एक दिवस उशिरा पाणीपुरवठा

Dhule News : गुरुवारी (ता. ८) या योजनेवरील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहील.
water tap
water tapesakal
Updated on

Dhule News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला १७ ठिकाणी गळत्या असल्याचे निदर्शनास आले आहे. या गळत्या रोखण्यासाठी धुळे महापालिकेतर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. ८) या योजनेवरील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहील. (Tapi water channel leaking in 17 places)

water tap
Jalgaon: NHAIच्या NOCवर महामार्गाचे अपग्रेडेशन! पालकमंत्र्यांची भूमिका निर्णायक; सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेणे गरजेचे

धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेवरील मुख्य जलवाहिनीवर नगावबारी एमबीआर ते सुकवद पंपिंग स्टेशनदरम्यान १७ ठिकाणी गळत्या लागल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या गळत्या दुरुस्तीचे काम महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे.

या कामासाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील. २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे धुळे शहरातील देवपूरचा काही भाग, मायक्रो टॉवर जलकुंभ, ऑक्सिडेशन जलकुंभ, मालेगाव रोड जलकुंभ, नाटेश्‍वर जलकुंभ, जामचा मळा जलकुंभ येथून नियोजनापेक्षा एक दिवस उशिरा पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

water tap
Dhule News: धुळे महापालिकेत प्रथमच ‘पथविक्रेता समिती’! समिती गठित करण्यात धुळे मनपा राज्यात दुसरी, नाशिक विभागात पहिली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.