Teachers Constituency Election : शिक्षकांच्या विविध प्रश्नांची मला जाण असून अनेक शिक्षकांना न्यायालयामार्फत न्यायहक्क मिळवून दिला आहे. शाळा न्यायाधिकरण तसेच युनिव्हर्सिटी ट्रिब्युनल या क्षेत्रात आतापर्यंत सुमारे एक हजारापेक्षा अधिक दावे हाताळले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या सभागृहात या घटकाच्या न्यायहक्कासाठी आवाज उठवेल आणि प्रश्न सोडवेल, अशी भूमिका अॅड. महेंद्र भावसार यांनी मांडली. (Dhule Teachers Constituency Election Adv Mahendra Bhavsar news)
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ॲड. भावसार यांनी उमेदवारी घोषित केली आहे. त्यांनी सांगितले, की राज्य विधान परिषद सभागृहात शिक्षकांचे प्रश्न मांडणारा शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून शिक्षक मतदारसंघाच्या नाशिक विभागातून दर सहा वर्षांनी शिक्षक आमदार निवडून दिला जातो. विद्यमान शिक्षक आमदारांचा कार्यकाळ पुढील महिन्यात पूर्ण होत असल्याने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे.
न्यायहक्कासाठी कार्य
गेल्या ३५ वर्षांपासून शाळा न्यायाधिकरण म्हणजेच स्कूल ट्रिब्युनलला मी शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय तसेच आयटीआय आदी विभागातील शिक्षकांसाठी सातत्याने न्यायालयात न्याय मिळावा म्हणून लढा देत त्यांची बाजू भक्कमपणे मांडत आलो आहे. शाळा न्यायाधिकरण तसेच युनिव्हर्सिटी ट्रिब्युनल या क्षेत्रात आतापर्यंत सुमारे एक हजारापेक्षा अधिक केसेस मी हाताळल्या आहेत. अनेक शिक्षकांना न्यायालयामार्फत न्याय मिळवून दिला आहे. (latest marathi news)
त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न
न्यायाची लढाई सुरू असताना शैक्षणिक कायद्यामध्ये काही महत्त्वाच्या त्रुटी आहेत असे निदर्शनास आले. कायदा बदलण्याचे अधिकार हे विधानसभा आणि विधान परिषदेला आहेत. त्यामुळे या कायद्यात काही मूलभूत बदल केल्यास शिक्षकांवरील अन्याय अधिक सुलभपणे दूर होऊ शकतो, असा विश्वास आहे. विधान परिषद आणि शिक्षक मतदार संघ हा प्रामुख्याने केवळ शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायासाठी निर्माण केला आहे.
शैक्षणिक कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी विधान भवनात जाऊन कायद्यात बदल करण्यासाठी आणि शिक्षकांना अभ्यासू आणि योग्य उमेदवार मिळावा. तसेच तसेच शिक्षकांसाठी मूलभूत प्रश्न घेऊन अभ्यासपूर्ण बाजू मांडणारा आमदार विधान भवनात जावा, अशी शिक्षकांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी करीत असून मतदार सेवेची संधी देतील, असे अॅड. भावसार यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.