Dhule Summer Heat : जिल्ह्यात पारा वाढला! दुपारी प्रचार थंडावला

Dhule News : शहर अलीकडे तापले आहे. धुळ्याने एप्रिलच्या अखेरीस ४२ अंश सेल्सिअस तापमानाला स्पर्श केला आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर दिसू लागला आहे.
Dhule Summer Heat
Dhule Summer Heatesakal
Updated on

Dhule News : शहर अलीकडे तापले आहे. धुळ्याने एप्रिलच्या अखेरीस ४२ अंश सेल्सिअस तापमानाला स्पर्श केला आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर दिसू लागला आहे. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्ते, समर्थकांनी दुपारी बारापूर्वी आणि सायंकाळी चारनंतर असे प्रचाराचे नियोजन केल्याचे दिसते. दुपारचे चार तास प्रचाराला सुटी दिल्यासारखी स्थिती दिसून येत आहे. (42 degree Celsius temperature in Dhule has affected Lok Sabha election campaign)

‘इतके कडक ऊन आम्ही कधी बघितले नव्हते’ असे जुनी-जाणती माणसे बोलू लागली आहेत. सूर्य आग ओकतोय, अशी परिस्थिती आहे. काही वर्षांपूर्वी ३५ सेल्सिअस तापमान, असे धुळ्याचे पोषक वातावरण होते. मात्र, ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगाचे तापमान वाढले, तसे धुळेही याला अपवाद ठरले नाही. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.

प्रत्येक दिवस, प्रत्येक तास प्रचारासाठी महत्त्वाचा मानला जातो. पण मार्चपासून तापमान वाढू लागले. आता एप्रिलच्या अखेरीस दुपारी बाहेर पडणे मुश्कील होईल, असा उष्मा वाढला आहे. त्यामुळे दुपारी रस्ते सामसूम असतात. ही परिस्थिती ग्रामीण भागांतही तशीच आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणांनी दुपारचे नियोजन थांबविल्याचे दिसते.

तडाखा वाढत जाणार

सकाळी सातला प्रचाराला सुरवात होत असल्याचे चित्र आहे. दुपारी बारापूर्वी प्रचारयंत्रणांचा पहिला टप्पा पूर्ण केला जातो. त्यानंतर दुपारी चारनंतर प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू होतो. मग रात्री दहापर्यंत प्रचार जोरात सुरू असल्याचे दिसते. (Latest Marathi News)

Dhule Summer Heat
Jalgaon News : ‘त्या’ पाचशेवर ॲप्रेंटिसधारकांना मिळाला न्याय! रक्षा खडसेंबद्दल कृतज्ञता व्यक्त

दुपारी बारा ते चारपर्यंत प्रचार थंडावल्याचे सध्या दिसत आहे. उन्हाचा तडाखा वाढत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने अलीकडेच व्यक्त केला आहे. याचा अर्थ या काळात प्रचार करण्याचे जाणीवपूर्वक टाळले जाईल. यापूर्वी सकाळी आणि दुपारी जाहीर सभा होत होत्या. सध्या या सभा होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.

पदयात्रा, जाहीर सभा, घरोघरी संपर्क या प्रचारतंत्राला दुपारी उष्म्यामुळे मर्यादा येत आहेत. यावर उपाय म्हणून उमेदवारांच्या प्रचार यंत्रणांनी नामी शक्कल लढवली आहे. दुपारचे चार-पाच तास वाया जाऊ नयेत, यासाठी रिक्षा, जीपच्या माध्यमातून लाउडस्पीकरद्वारे मतदारांना आवाहन केले जात आहे.

Dhule Summer Heat
Jalgaon Lok Sabha Constituency : अमळनेरातील विरोधक ‘दादा’ ताईसाठी आले एकत्र!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.