Dhule Leopard News : दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर जेरबंद; वन विभागाच्या पथकाला यश

Dhule Leopard : आठवडाभरापासून वावरणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. १) पहाटे आसाराम आश्रमातून जेरबंद केले.
A captive leopard in a cage planted by the forest department.
A captive leopard in a cage planted by the forest department.esakal
Updated on

Dhule Leopard News : शहरातील साक्री रोड परिसर, महिंदळे शिवार, नकाणे तलाव परिसरात मागील आठवडाभरापासून वावरणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. १) पहाटे आसाराम आश्रमातून जेरबंद केले. त्यामुळे बिबट्याच्या दहशतीत असलेल्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. धुळे शहरालगत नकाणे तलाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याची माहिती परिसरातील रहिवाशांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. (terror causing leopard is finally caught by forest department )

या बिबट्याचे काही व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे साक्री रोड, महिंदळे शिवार, नकाणे तलाव परिसरातील अनेक कॉलन्यांमधील रहिवासी तसेच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या, रात्री-अपरात्री कामावरून परतणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. परिसरातील कुत्र्यांची संख्यादेखील कमी झाल्याची चर्चा होती. दोन दिवसांपूर्वी नकाणे तलाव परिसरातील आश्रमातील एका वासरावरही बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. त्यामुळे बिबट्याची दहशत अधिक वाढली. दरम्यान, वन विभागाची सात जणांची टीम डोळ्यात तेल घालून बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवून होती.

ज्या ठिकाणी बिबट्या दिसत असे, त्या ठिकाणी पिंजरे, ट्रॅप कॅमेरे लावल्यावरही बिबट्या नंतर त्या ठिकाणाहून गायब होत असल्याने वन विभागाने परिसरातील रहिवाशांना दक्षतेचे आवाहन केले होते. बिबट्या सतत जागा बदलत असल्याने वन अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही त्याचा ठावठिकाणा समजत नव्हता. ज्या ठिकाणी एका वासरावर बिबट्याने हल्ला केला होता, त्याच ठिकाणी वन अधिकारी भूषण वाघ यांनी भक्ष्यासह ट्रॅप कॅमेरा व पिंजरा लावला. ज्या वासरावर बिबट्याने हल्ला केला होता, त्याच जागेवर तेच वासरू भक्ष्य म्हणून पिंजऱ्यात ठेवले. (latest marathi news)

A captive leopard in a cage planted by the forest department.
Dhule Leopard Attack : मुक्या प्राण्यांमुळे मालकाचे वाचले प्राण!

पहाटे बिबट्या पिंजऱ्यात

गुरुवारी (ता. १) पहाटे तीन वाजून २६ मिनिटांनी बिबट्या त्या ठिकाणी आला. त्याने पिंजऱ्यात शिरकाव केला अन् तो तेथेच बंद झाला. सकाळी वन विभागाच्या पथकाने पिंजऱ्यात कैद झालेला बिबट्या सुरक्षितस्थळी हलविला. मुख्य वन संरक्षक निनू सोमराज, उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग, विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर.

संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ, वनपाल निंबाळकर, प्रकाश सोनार, नितीन सांगळे, वनरक्षक चेतन काळे, राकेश पाटील, प्रशांत लांडगे, जिंदल इंगळे, प्रसाद पाटील, विलास पाटील, वाहनचालक विठ्ठल ठाकरे व साजिद शेख यांनी ही मोहीम फत्ते केली. दरम्यान, नर बिबट्यासोबत मादी असण्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाच्या पथकाने परिसरात ड्रोनच्या सहाय्याने वॉच ठेवला. मात्र तशी शक्यता नसल्याचे दिसून आले. त्यानंतर जेरबंद बिबट्याला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

A captive leopard in a cage planted by the forest department.
Dhule Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त! म्हसदीतील एंगडे शिवारात शेतकऱ्यांमध्ये भीती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.