Dhule Holi Festival : पारंपरिक होळी अन् ‘डिजे’वर रंगोत्सव! धुळे शहरासह जिल्ह्यात होळी, धुळवड उत्साहात साजरी

Dhule News : धुळे शहरासह जिल्ह्यात होळी सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला.
Youth participating in Dhulivandan program organized by Khanderao Bazar Mitra Mandal, Dakshinmukhi Maruti Mandal in the city.
Youth participating in Dhulivandan program organized by Khanderao Bazar Mitra Mandal, Dakshinmukhi Maruti Mandal in the city.esakal
Updated on

धुळे : शहरासह जिल्ह्यात होळी सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. होळी सणाच्या पाठोपाठ येणारी धुळवड, धूलिवंदन, रंगपंचमीची धूम मात्र धुळेकरांसाठी काही औरच होती. होळी पेटविल्यानंतर लगेचच या रंगोत्सवात न्हाऊन निघण्याची घाई विशेषतः तरुण व लहान मुलांना असते. यंदाही रंगोत्सवाची ही धूम होळी सणाच्या रात्री व दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाली. (Dhule Traditional Holi Rangotsav on DJ Dhulwad celebrated with enthusiasm in city district marathi news)

रंग बरसे भिगे चुनरवाली.., होरी खेले रघुवीरा... अशा खास होळी व रंगोत्सवाच्या गाण्यांनी शहरातील गल्ली, चौक निनादून गेले. होळीच्या रात्रीच ठिकठिकाणी विविध मित्रमंडळांच्या माध्यमातून डिजेच्या तालावर तरुणाई थिरकू लागली. सोमवारी (ता.२५) सकाळपासूनच या रंगोत्सवाची धामधूम पाहायला मिळाली.

घराघरांत, गल्लीत, चौकात आणि संपूर्ण शहरात विविध रंगांनी न्हाऊन निघालेले तरुण-तरुणी, लहान मुले-मुली, महिला या रंगोत्सवात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. एकमेकांना रंग लागून त्यांचे चेहरे अनोळखी करण्यापर्यंत रंग लावले गेले. एकमेकांवर पाणी टाकून, पाण्याचे फुगे मारून व धुळ्याची खास ओळख असलेल्या डोलचीच्या माऱ्याने यात अधिकच रंग भरला.

शहरातील खंडेराव बाजार मित्र मंडळ, दक्षिणमुखी मारोती मंडळ, मरीमाता मंडळातर्फे आयोजित रंगोत्सवाच्या या कार्यक्रमांना मोठी गर्दी उसळली होती. धुळ्यातील खंडेराव बाजारच्या होळी आणि धुळवडीचे आकर्षण मोठे आहे. नोकरी, रोजगारानिमित्त बाहेर असलेली मंडळी होळीसाठी धुळ्यात आल्यानंतर खंडेराव बाजारच्या होळीत रंगांची उधळण करतात. रेन डान्स आणि डोलचीच्या फटकाऱ्यांनी यंदाही रंग भरले.  (latest marathi news)

Youth participating in Dhulivandan program organized by Khanderao Bazar Mitra Mandal, Dakshinmukhi Maruti Mandal in the city.
Nashik Holi Festival : मालेगाव परिसरात पारंपारिक पद्धतीने होळीचा सण साजरा! संगमेश्‍वरात शतकोत्तर परंपरा

दक्षिणमुखीची धुळवड

शहरातील दक्षिणमुखी मारोती मंडळाची होळीदेखील धुळेकरांसाठी खास आकर्षण. माजी नगरसेवक सुनील महाले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे धुळवड साजरी होते. गेल्या ३० वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून होलिकोत्सव साजरा होत आहे.

यंदाही होळीच्या दिवशी संध्याकाळी सहा ते रात्री दहाच्या दरम्यान तरुणाई मनसोक्तपणे शॉवरमध्ये भिजत डिजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा पावले थिरकू लागली. दुपारी बारा-एक पर्यंत हा उत्सव सोहळा सुरू होता. स्वतः श्री. महाले, सतीश महाले हे तरुणाईसोबत थिरकले.

या धूलिवंदन उत्सवासाठी श्री दक्षिण मुखी मारुती मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच गल्ली नंबर ४ मधील मरीमाता मंडळ, छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेतर्फेही होळी, धुळवड मोठ्या उत्साहात साजरी झाली. इतरत्र चौकाचौकांत त्या-त्या भागातील तरुणांसह लहान मुलांनी होळी, धुळवडीचा आनंद लुटला.

Youth participating in Dhulivandan program organized by Khanderao Bazar Mitra Mandal, Dakshinmukhi Maruti Mandal in the city.
Holi Festival 2024 : देवळ्यात पर्यायावरणपूरक होळी व धुळवड साजरी; नैसर्गिक शेती करण्याचाही दिला संदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.