Dhule Traffic Rule : शहरात प्रवेशित 28 अवजड वाहनांवर कारवाई; प्रवेशबंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू

Traffic Rule : धुळे शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
Traffic police taking action against heavy vehicles entering the city.
Traffic police taking action against heavy vehicles entering the city.esakal
Updated on

Dhule Traffic Rule : शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, वाहतूक कोंडी व अपघात टळावेत यासाठी धुळे शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. बुधवारी (ता. २९) सकाळी आठ ते दुपारी दोनदरम्यान शहरात प्रवेशित एकूण २८ अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनचालकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करून त्यांची वाहने पुन्हा शहराबाहेर पाठविण्यात आली. ( Action on 28 heavy vehicles entering city )

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करताना शहर वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी बुधवारी (ता. २९) सकाळी आठ ते दुपारी दोनदरम्यान धुळे शहरातील दत्त मंदिर चौक, कराची चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चाळीसगाव रोड यामार्गे शहरात प्रवेश केलेल्या एकूण २८ अवजड वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली. तसेच प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारून ही वाहने पुन्हा शहराबाहेर पाठविली. बंदीच्या काळात अवजड वाहनधारकांनी शहरात वाहने आणू नयेत, अशी सूचना श्री. धिवरे यांनी केली. (latest marathi news)

Traffic police taking action against heavy vehicles entering the city.
Nashik Traffic Rules Break : वाहतूक शाखेच्या मोहिमेचा ‘फज्जा’! बेशिस्त वाहनचालक जुमानात कारवाईला

अपघातानंतर रेटा

शहराच्या देवपूर भागात एल. एम. सरदार हायस्कूलसमोर २६ मेस रोहित सूर्यवंशी या १८ वर्षीय तरुणाचा ट्रक अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशावर सामान्य नागरिकांसह विविध पक्ष-संघटनांकडून आवाज उठविण्यात आला. अवजड वाहनांमुळे शहरात अनेक अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

त्यामुळे अवजड वाहनांना निर्धारित वेळेत शहरात प्रवेशबंदीची मागणी झाली. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक धिवरे यांनी अवजड वाहनांना प्रवेशबंदीचा आदेश काढून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आहे.

Traffic police taking action against heavy vehicles entering the city.
Jalgaon Traffic Rule : सुसाट वाहनांच्या अनियंत्रित वेगावर मर्यादा हवीच! नवीन रस्त्यांची मालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.