Dhule News : भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारीपदावरील भरतीसाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी १७ मे २०२४ ला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय. (Dhule Training for Army Officer Recruitment)
धुळे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी ले. कर्नल विलास सोनवणे (निवृत्त) यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी २० ते २९ मे २०२४ या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ५७ साठी प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शुल्क असेल.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे १७ मेस सकाळी अकराला शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रतीसह मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना विद्यार्थ्यांनी https://www.mahasainik.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन एसएसबी ५७ कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत संबंधित परिशिष्ट उपलब्ध होईल. (Latest Marathi News)
कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पूर्ण भरून दोन प्रती सोबत आणाव्यात. एसएसबी प्रवेशासाठी कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा अथवा नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी परीक्षा पास झालेली असावी व त्यासाठी सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण असावेत.
तसेच एनसीसी ग्रुप हेडर्क्वाटरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. तसेच विद्यापीठ एन्ट्री स्कीमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी ०२५५३-२४५१०३2२, व्हॉट्सॲप- ९१५६०७३३०६ किंवा ईमेल training.pctcnashik@gmail.com वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.