Dhule News : पंधरा दिवसांत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होतील, अशा सूचना आमदार तांबे यांनी तक्रार निवारण सभेत दिल्या. धुळे जिल्हा परिषदेत नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षकांची तक्रार निवारण सभा झाली. या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे, चारही तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, वित्त विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे डॉ. बोडके, तसेच शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, लिपिक उपस्थित होते. (Transfer of primary teachers within 15 days Grievance redressal meeting MLA Tambe instructions )
तक्रार निवारण सभेत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या येत्या पंधरा दिवसांत करण्याची आमदार तांबे यांनी सूचना केली. यासोबतच जिल्ह्यातील शाळांची शनिवारची वेळ सकाळी करण्यात यावी. लवकरच त्याबाबत शिक्षण संचालक यांच्याकडे बैठक घेऊन तो विषय मार्गी लावण्यात येईल, असे तांबे यांनी आश्वासित केले.
या वेळी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, भगवंत बोरसे, शरद सूर्यवंशी, विजय खैरनार, राजेंद्र पाटील, साहेबराव गिरासे, प्रवीण भदाणे, भूपेश वाघ, श्यामकांत अहिरराव, प्रभाकर मेटकर, राजेंद्र नांद्रे, जगदीश बडगुजर, ज्ञानेश्वर कंखर, शरद युवराज पाटील, महेंद्र बोरसे, बापू पारधी, दत्तात्रय पाटील, हृषीकेश कापडे, संजय वाघ, नगराम जाधव, अनिल चौधरी, छोटू राजपूत, रूपेश जैन, सुनील पाटील, धीरज परदेशी, संतोष जाधव, सागर पवार, देवेंद्र पाटील, तुषार महाले, अमोल शिंदे, सुहाग सोनवणे, जयसिंह भुईटे, संजय पोतदार, गमन पाटील, अनिल अहिरे आदी उपस्थित होते. (latest marathi news)
या विषयांवरही चर्चा
२४ वर्षे वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत मंत्रालयस्तरावर याविषयी चर्चा सुरू आहे. लवकरच सरसकट सर्वांना वरिष्ठ वेतनश्रेणी लावण्याबाबत निर्णय होणार आहे. विनंती बदल्या झाल्यानंतर पदोन्नती मुख्याध्यापक, विषय शिक्षक पदोन्नती करण्यात यावी. प्राथमिक शिक्षकांना व मुख्याध्यापकांना विविध प्रकारच्या लिंक तत्काळ भराव्या लागतात. ते काम फक्त शनिवारी घेण्यात यावे. बीएलओचे काम ऐच्छिक करण्यात यावे.
जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. पदोन्नती मुख्याध्यापकांना वेतनवाढी तत्काळ लावण्यात याव्यात. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना एक वेतनवाढ देण्यात यावी. विद्यार्थ्यांचे गणवेश व बूट अनुदान तत्काळ वितरित करण्यात यावे. येत्या तीन महिन्यांत सर्वांचे जीपीएफ खाते ऑनलाइन करण्यात यावे यासह विविध विषयांवर चर्चा होऊन त्याची प्रोसेडिंगमध्ये नोंद घेण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.